तरुणाची हातोड्यानं हत्या करुन भर रस्त्यात मांस खाल्लं, रक्तही प्यायला, पोलिसही पकडायला घाबरले; हादरवून टाकणारं प्रकरण

Crime News : माणुसकीला लाजवेल अशी एक थरारक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाची हातोड्याने निर्घृण हत्या करण्यात आली असून, हत्येनंतर आरोपीने केलेल्या क्रूरतेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. एका मनोरुग्ण तरुणाने भररस्त्यात ही खळबळजनक हत्या केली. या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 12:49 PM • 06 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाची हातोड्यानं हत्या करुन भर रस्त्यात मांस खाल्लं, रक्तही प्यायला

point

पोलिसही पकडायला घाबरले

point

हादरवून टाकणारं प्रकरण

Crime News : माणुसकीला लाजवेल अशी एक थरारक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाची हातोड्याने निर्घृण हत्या करण्यात आली असून, हत्येनंतर आरोपीने केलेल्या क्रूरतेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. एका मनोरुग्ण तरुणाने भररस्त्यात ही खळबळजनक हत्या केली. या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा :  अनैतिक संबंध, ब्लॅकमेलिंग आणि पैशांची मागणी! महिला शेतकरी नेत्याच्या हत्येने खळबळ, नेमकं काय घडलं?

मांस खाल्ले अन् रक्तही प्यायला

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने भररस्त्यात एका तरुणावर हातोड्याने वार करून त्याची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता, मृत्यूनंतर आरोपी त्या तरुणाचे मांस खाताना आणि रक्त पिताना दिसला. हा अघोरी प्रकार पाहून आसपासचे नागरिक हादरून गेले. कॉलनीतील अनेक लोकांनी आपल्या बाल्कनीतून हा प्रकार पाहिला आणि काही जणांनी ही भयावह दृश्ये मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. या हैवानियतमुळे परिसरात घबराट पसरली असून लोकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले.

पोलिसही घाबरले

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र आरोपीवर ताबा मिळवताना पोलिसांची मोठी कसरत झाली. रक्ताने माखलेला हा आरोपी इतका हिंसक झाला होता की, तो पोलीस आणि ग्रामस्थांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. कोणाचीही त्याच्या जवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. अखेर ग्रामस्थांनी त्याला चहुबाजूंनी घेरले आणि पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला बेड्या ठोकल्या. या थराराचा व्हिडिओही समोर आला असून त्यात आरोपीची आक्रमकता स्पष्टपणे दिसून येत आहे.

हे ही वाचा : भारताचा 'हा' जुना मित्र बनणार संकटमोचक, 95 लाख बॅरल कच्चे तेल पाठवणार; भारताकडे 'इतकाच' तेलसाठा शिल्लक

लहरीपणामुळे हत्या

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भरत नावाच्या तरुणाला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विशेष म्हणजे, मृत तरुण आणि आरोपी यांच्यात कोणताही जुना वाद किंवा शत्रूत्व नव्हते. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसून लहरीपणामुळे हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. या अमानवीय हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
 

    follow whatsapp