एका मुलाच्या आईवर जडला 14 वर्षीय तरुणाचा जीव! शेतात शारीरिक संबंध ठेवायला गेला अन् नको ते घडलं...
14 वर्षीय तरुणाने 40 वर्षीय महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यासाठी पीडितेने विरोध केल्यानंतर तिच्यासोबत धक्कादायक घटना घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एका मुलाच्या आईवर जडला 14 वर्षीय तरुणाचा जीव!
शारीरिक संबंध ठेवायला गेला अन् नको ते घडलं...
Crime News: उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका 14 वर्षीय तरुणाने 40 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त आहे. दरम्यान, पीडितेने यासाठी विरोध केला असता संबंधित तरुणाने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित घटना ही 3 नोव्हेंबर रोजी घडली.
शेतात लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न...
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या शेतात काम करत असताना नववी इयत्तेत शिकणाऱ्या एका तरुणाने तिच्यावर हल्ला केला. आरोपी तरुण हा महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पीडितेने तरुणाला विरोध केला असता आरोपी संतापला आणि त्याने तिच्यावर कोयता आणि दांडक्याने जीवघेणा हल्ला केला. त्यावेळी, पीडिता या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाली.
हे ही वाचा: भंडारा हादरला! लग्न जमवून देत नसल्याने 33 वर्षीय मुलाने बापाच्या डोक्यात वीट घातली, जागेवर संपवलं
हल्ल्यात पीडितेचा मृत्यू
रिपोर्ट्सनुसार, तिथल्या गावकऱ्यांना पीडित महिला रक्ताच्या थारोळ्यात आढळली. त्यानंतर, तिला तातडीने चंडीगड येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान, पीडित महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली. सुरुवातीला त्यांनी घटनास्थळावरून बऱ्याच संशयास्पद वस्तू आणि हल्ल्यात वापरण्यात आलेली हत्यारे ताब्यात घेतली आहेत.
हे ही वाचा: मोठी बातमी : राज्यातील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा
आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी
पोलिसांनी प्रकरणातील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. कठोर चौकशीदरम्यान, 14 वर्षीय आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर, आरोपी अल्पवयीन असल्याकारणाने त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आलं. मृत महिलेला 17 वर्षांचा एक मुलगा असून असून तो अपंग आहे. पीडिता एकटीच आपल्या मुलाला सांभाळत होती. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रकरणातील अल्पवयीन तरुणाला अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. आता गावकऱ्यांनी त्या आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.










