आपल्या वडिलांनाच शिव्या देत म्हणाली "मरून जा..." प्रसिद्ध यूट्यूबरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल!

यूट्यूबर वंशिका व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपल्या वडिलांसोबत अतिशय वाईट कृत्य करत असल्याचं दिसत आहे. इतकेच नव्हे तर, ती तिच्या वडिलांना शिवीगाळ करत असल्याचं देखील व्हिडीओ मध्ये पाहायला मिळतंय.

प्रसिद्ध यूट्यूबरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल!

प्रसिद्ध यूट्यूबरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल!

मुंबई तक

• 05:54 PM • 08 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रसिद्ध यूट्यूबरचं आपल्या वडिलांसोबत दुष्कृत्य...

point

आपल्या वडिलांनाच शिव्या देत म्हणाली "मरून जा..."

point

यूट्यूबरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल!

Crime News: प्रसिद्ध यूट्यूबर वंशिकाचा नवा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. वंशिका ही उत्तर प्रदेशातील हापुडची रहिवासी असून ती व्हिडीओत आपल्या वडिलांसोबत अतिशय वाईट कृत्य करत असल्याचं दिसत आहे. इतकेच नव्हे तर, ती तिच्या वडिलांना शिवीगाळ करत असल्याचं देखील व्हिडीओ मध्ये पाहायला मिळतंय. या व्हिडीओ मध्ये वंशिकाचे वडील तिला म्हणतात की, "मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये." यावर वंशिका तिच्या वडिलांना शिव्या देत ओरडून म्हणते की, "तू बुडून मरून जा." त्यावेळी, वंशिकाची आई सुद्धा घटनास्थळावर उपस्थित होती. हा व्हिडीओ संपत्तीवरून चाललेल्या कौटुंबिक वादाशी संबंधित असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

आईला सुद्धा केली होती मारहाण...

6 नोव्हेंबर रोजी वंशिकाचा असाच एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये ती आपल्या आईला मारहाण करत असल्याचं दिसून आलं होतं. त्या व्हिडीओत वंशिका सतत "हे घर माझं आहे, प्लॉट माझं आहे" असं ओरडत म्हणत होती. इतकेच नव्हे तर, वंशिका आपल्या आईचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. आईने केलेल्या आरोपानुसार, वंशिकाने तिच्याकडे पैसे मागितले होते आणि यासाठी आईने नकार दिला असता आरोपी वंशिकाने तिच्यावर हल्ला केला.

वंशिकाच्या आईचे आरोप   

वंशिकाची आई बंटी देवीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं की, वंशिका गेल्या दोन वर्षांपासून तिच्या मॅनेजर बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तिने तिच्या कमाईतून तिच्या प्रियकराच्या नावावर कार आणि स्कूटर खरेदी केली होती.आता वंशिका आणि तिचा बॉयफ्रेंड तिच्या कुटुंबियांचं घर आणि प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आईचा आरोप आहे. 

हे ही वाचा: विधवा झालेल्या वहिनीला दीराने घातली लग्नाची मागणी! पण, महिलेने नकार देताच घडली भयानक घटना...

यश मिळाल्यानंतर वागण्यात बदल...

वंशिका तिच्या यूट्यूब चॅनेलवर डान्स, फॅशन आणि व्लॉगिंग करून पैसे कमवते. तिच्या यूट्यूब चॅनेलवर 1.90 लाख सब्सक्राइबर्स आणि इंस्टाग्राम अकाउंटवर 7.42 लाख फॉलोअर्स आहेत. वंशिकाच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, वंशिकाला यश मिळाल्यानंतर तिच्या वागण्यात पूर्णपणे बदल झाला. मात्र, वंशिकाची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला असता तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. वंशिकाच्या मॅनेजर अभिषेकच्या आईने सुद्धा यासंदर्भात बोलण्यास नकार दिला आणि फक्त ती म्हणाली की ते दोघेही त्यांच्या दिल्लीतील फ्लॅटमध्ये राहतात.

हे ही वाचा: ट्रेनमध्ये 'त्या' कारणावरून पती आणि पत्नीमध्ये मोठं भांडण! थेट चाकूने हल्ला करून निर्घृण हत्या...

पोलिसांच्या माहितीनुसार, वंशिकाच्या आईने मुलीवर दृष्कृत्य आणि मारहाणीचा आरोप केला आहे. तसेच, संबंधित प्रकरण हे कौटुंबिक संपत्ती वादाचं आहे. आता या प्रकरणाचा तपास सुरू असून तपासानंतरच, आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाईल. 

    follow whatsapp