ट्रेनमध्ये 'त्या' कारणावरून पती आणि पत्नीमध्ये मोठं भांडण! थेट चाकूने हल्ला करून निर्घृण हत्या...

मुंबई तक

गावी जाताना वाटेतच ट्रेनमध्ये पती आणि पत्नीचं एकमेकांसोबत मोठं भांडण झालं आणि पतीने संधी साधून पत्नीवर हल्ला करत तिची निर्घृण हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

थेट चाकूने हल्ला करून निर्घृण हत्या...
थेट चाकूने हल्ला करून निर्घृण हत्या...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ट्रेनमध्ये 'त्या' कारणावरून पती आणि पत्नीमध्ये मोठं भांडण!

point

थेट चाकूने हल्ला करून निर्घृण हत्या...

point

नेमकं काय घडलं?

Crime News: एका तरुणाने त्याच्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. खरं तर, दोघांची इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली होती. त्यानंतर, त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. प्रेमसंबंधातून त्या दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं. मात्र, लग्नानंतर त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि एके दिवशी, संधी साधून पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी पतीला अटक केल्याची माहिती आहे. संबंधित घटना ही उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे घडली. 

रेल्वे ट्रॅकच्या कडेला अज्ञात महिलेचा मृतदेह 

6 नोव्हेंबर रोजी बीघापूर परिसरातील टिकौली रावतपूर हॉल्टपासून 200 मी. अंतरावर असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या कडेला एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. संबंधित महिलेच्या गळ्यावर काही जखमी आढळल्या. रायबरेली जिल्ह्यातील जगतपूर पोलिस स्टेशन हद्दीतील दुर्गागंज गावात राहणारी 18 वर्षीय तरुणी अशी मृत महिलेची ओळख असल्याचं समोर आलं आहे. ओळख पटल्यानंतर, मृत महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बिघापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात शिवमोहन जाटव या 23 वर्षीय तरुणाला आरोपी ठरवण्यात आलं आणि पोलीस आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्नात असल्याची माहिती आहे. 

आरोपी तरुणाला अटक 

7 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास, जंगली खेडा कालव्याच्या कल्व्हर्टजवळ बिघापूर पोलीस, स्वाट आणि सर्व्हिलांसच्या पथकांमध्ये झालेल्या चकमकीत एका तरुणाला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, जखमी गुन्हेगाराने आपलं नाव शिवमोहन जाटव असल्याचं सांगितलं. तसेच, घटनास्थळावरून एक चाकू आणि रक्ताने माखलेले कपडे सुद्धा पोलिसांनी जप्त केले. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मेट्रोचा प्रवास महागणार? लोकलचा पर्याय चांगला... मेट्रोच्या 'या' मार्गांवर होणार परिणाम!

इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली ओळख...

पोलिसांनी आरोपीची कठोर चौकशी केली असता त्याने सांगितलं की, नोव्हेंबर 2025 रोजी इंस्टाग्रामच्या माध्यमातून माझी एका तरुणीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर, आमच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि आम्ही दोघांनी 15 एप्रिल 2025 रोजी एकमेकांसोबत लग्न केलं. लग्नानंतर, आम्ही कानपूरमध्ये एका भाड्याच्या घरात राहू लागलो." पोलिसांच्या माहितीनुसार, लग्न झाल्याच्या काही दिवसांनंतरच पती आणि पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याचं आरोपीने सांगितलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp