विधवा झालेल्या वहिनीला दीराने घातली लग्नाची मागणी! पण, महिलेने नकार देताच घडली भयानक घटना...
एका व्यक्तीने विधवा महिलेवर तिच्या माहेरच्या घरात घुसून अॅसिड अटॅक केल्याचं वृत्त आहे. प्रकरणातील आरोपी हा पीडित महिलेचा दीर असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विधवा झालेल्या वहिनीला दीराने घातली लग्नाची मागणी!
महिलेने नकार देताच घडली भयानक घटना...
Crime News: मध्य प्रदेशातील ग्वालियर येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने विधवा महिलेवर तिच्या माहेरच्या घरात घुसून अॅसिड अटॅक केल्याचं वृत्त आहे. प्रकरणातील आरोपी हा पीडित महिलेचा दीर असल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर, दीराला त्या महिलेसोबत लग्न करायचं होतं. यासाठी, आरोपीने तिला लग्नाची मागणी सुद्धा घातली होती. मात्र, संबंधित महिलेने तिच्या दीराला लग्नासाठी नकार दिल्यानंतर तो प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात त्याने पीडितेसोबत असं भयानक कृत्य केलं. सध्या, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.
घरात घुसून अॅसिडने हल्ला
संबंधित घटना कंपू पोलीस स्टेशन हद्दीतील अवाडपुरा परिसरात घडली. शुक्रवारी (7 नोव्हेंबर) संध्याकाळी आपल्या माहेरच्या घरात राहत असलेल्या एका विधवा महिलेवर तिच्या दीराने घरात घुसून अॅसिडने हल्ला केला. या हल्ल्यात पीडिता गंभीररित्या जखमी झाली. उपचारांसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकरणातील आरोपीचं नाव मुशीर खान असल्याची माहिती आहे.
पीडितेवर लग्नासाठी सतत दबाव
आरोपी व्यक्ती पीडितेवर लग्नासाठी सतत दबाव आणायची. त्यानंतर, संबंधित महिलेने आरोपीला लग्नासाठी स्पष्टपणे नकार दिल्यानंतर संतापलेल्या तरुणाने विधवा महिलेसोबत भयानक कृत्य केलं. आरोपीने पीडितेवर केलेल्या हल्ल्यात तिचा पूर्ण चेहरा, हाथ आणि पाय पूर्णपणे भाजल्याचं वृत्त आहे. संबंधित घटनेच्या वेळी, पीडिता तिच्या घरात भाजी चिरत होती. तेव्हा, अचानक तिच्या दीराने घरात घुसून तिच्यावर हल्ला केला.
हे ही वाचा: ट्रेनमध्ये 'त्या' कारणावरून पती आणि पत्नीमध्ये मोठं भांडण! थेट चाकूने हल्ला करून निर्घृण हत्या...
काही महिन्यांपूर्वी, पीडित महिलेच्या पतीचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर, पत्नी तिच्या माहेरीच राहत होती. संबंधित महिलेला एका 10 वर्षांचा मुलगा आणि एक 4 वर्षांची मुलगी आहे. तसेच, आरोपी मुशीर खानच्या पत्नीचं सुद्धा निधन झालं होतं. दरम्यान, आरोपीला तिच्या लहान वहिनीसोबत लग्न करायचं होतं. याच कारणामुळे तो सतत मुलांना भेटण्याच्या बहाण्याने पीडितेच्या माहेरी जायचा.










