Crime News: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये तीन बहिणींनी 9 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा झाल्याचं वृत्त आहे. सोसायटीच्या लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून चकित करणारी बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी DVR जप्त केल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिफ्टमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटनेच्या वेळी सर्व हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजनुसार, तिघी मुली खाली पडल्यानंतर त्यांचे वडील चेतन, त्यांची पत्नी सुजाता आणि टीना उर्फ नाजनीन लिफ्टमधून 9 व्या मजल्यावर आले. ज्यावेळी मुलींनी बाल्कनीतून उडी मारली, त्यावेळी वडील त्यांच्या पत्नींसह त्याच लिफ्टमधून ग्राउंड फ्लोरवर आले आणि नंतर सर्वजण घरातून बाहेर निघाले.
ADVERTISEMENT
लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टमधून वर आल्यानंतर काही वेळाने, टीना उर्फ नाजनीन लिफ्टने पुन्हा नवव्या मजल्यावर गेली. खाली तिन्ही मुलींचे विद्रूप अवस्थेत मृतदेह पडले होते. तोपर्यंत सोसायटीतील सगळे लोक खाली जमले होते. सोसायटीतील लोकांनी चेतन यांना सांगितलं की, मुलींच्या मृतदेहावर कापड तरी घाला. यानंतर, चेतन आणि सुजाता लिफ्टमधून कापड आणण्यासाठी वर जातात. नवव्या मजल्यावर लिफ्ट ओपन झाल्यानंतर, टीना उर्फ नाजनीन तिच्या तीन वर्षांच्या मुलीला मांडीवर घेऊन बसलेली दिसली आणि तिच्या हातात कापड सुद्धा होतं.
हे ही वाचा: Personal Finance: SIP मधून जबरदस्त पैसा मिळविण्याचं एक मोठं गुपित!
त्यानंतर, चेतना, सुजाता आणि टीना यांचं लिफ्टमध्ये मोठं भांडण होतं. दरम्यान, त्यापैकी कोणीही लिफ्टचे बटण दाबू शकत नाही आणि लिफ्ट 9 व्या मजल्यावरच थांबली. थोड्या वेळाने, चेतनने लिफ्टचं बटण दाबलं. यावेळी लिफ्टमध्ये जे काही घडतं ते अतिशय धक्कादायक होतं. तिघांमध्ये भांडण सुरू असताना टीना अचानक सुजाताच्या कानाखाली मारते. तेव्हा चेतन रागाने दोघांवर हात उगारतो. तो दोघांनाही गप्प राहण्यास सांगत असल्याचं त्याच्या कृत्यावरून स्पष्ट होत आहे.
यानंतर, तिघेही लिफ्टमधून ग्राउंट फ्लोरवर येतात. लिफ्टच्या या घटनेत अनेक प्रश्नांची उत्तरे आहेत. चेतन आणि त्याच्या पत्नींमध्ये भांडण का झाले? अपघातापूर्वी चेतनच्या अपार्टमेंटमध्ये असं काही घडले होते का ज्यामुळे ही दुर्घटना घडली? पोलिसांनी या घटनेचा डीव्हीआर आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT











