आईने मुलाचा जीव वाचवण्यासाठी मुलीचा घेतला बळी, जादूटोणा आणि अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस

मुंबई तक

02 Apr 2026 (अपडेटेड: 02 Apr 2026, 01:27 PM)

Crime News : मुलाचा जीव वाचवण्याच्या नादात कुटुंबिय अंधश्रद्धेला बळी पडले आणि मुलीचा बळी घेतला.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अंधश्रद्धेला बळी पडून 12 वर्षीय मुलीची हत्या

point

आईनेच मुलासाठी लेकीचा घेतला बळी

Crime News : झारखंडच्या हजारीबागच्या विष्णूगड परिसरात 12 वर्षीय एका मुलीची हत्या करण्यात आली. मुलाचा जीव वाचवण्याच्या नादात हे कृत्य घडलं. कुटुंबिय अंधश्रद्धेला बळी पडल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याची माहिती आहे. जादुटोणा आणि अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली, आरोपी आईने आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी मुलीचा बळी दिल्याची माहिती आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : तीन मुलांची आई प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडली, गावकऱ्यांनी पिलरला बांधलं अन्...

अंधश्रद्धेला बळी पडून 12 वर्षीय मुलीची हत्या

हजारीबाग जिल्ह्यातील विष्णूगड परिसरातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांच्या माहितीनुसार, 12 वर्षीय मुलीची हत्या एक सामान्य घटना नसून, अंधश्रद्धा आणि नरबळीशी संबंधित एक भयानक सत्य आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येमागे मुलीच्या आईचा मोठा सहभाग होता. 

आईनेच मुलासाठी लेकीचा घेतला बळी

पोलिसांच्या मते, जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेल्या आरोपी आईने, आपल्या मुलाला वाचवण्याच्या आशेने आपल्या मुलीचा बळी दिला. ज्या आईने आपल्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी मुलीचा बळी घेतला. या घटनेनं अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा मोठा प्रकार उघडकीस आला आहे.  

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' एका कारणामुळे 68 लाख लाडक्या बहि‍णींची खाती बंद, नेमकं काय घडलं?

संबंधित प्रकरणातून असे उघडकीस आले की, महिलेचे एका पुरुषाशी अनैतिक संबंध सुरु होते. त्याच्याच प्रभावाखाली हा कट रचण्यात आला होता. अंधश्रद्धा आणि वाईट संगतीने मिळून निष्पाप मुलाचा जीव घेतला. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली, पुढील तपास सुरु केला आहे.