Sangli Crime : अनैतिक संबंधांत अडसर ठरला, आईने प्रियकरासह पोटच्या पोरालाच संपवलं

मुंबई तक

09 May 2023 (अपडेटेड: 09 May 2023, 03:00 PM)

six year old boy murder by mother and her boyfriend : अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या 6 वर्षाच्या पोटच्या पोराचा अपहरणाचा बनाव करून आईनेच प्रियकरासह त्याला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील लेंगरे येथे ही घटना घडली आहे.

six year old boy murder by mother and her boyfriend sangli

six year old boy murder by mother and her boyfriend sangli

follow google news

six year old boy murder by mother and her boyfriend : अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या 6 वर्षाच्या पोटच्या पोराचा अपहरणाचा बनाव करून आईनेच प्रियकरासह त्याला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील लेंगरे येथे ही घटना घडली आहे.या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनीा लेंगरे येथील आईसह जोंधळखिंडीत राहणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.विशेष म्हणजे विटा पोलिसांच्या पथकाने केवळ 3 दिवसात या संपूर्ण प्रकाराचा छडा लावला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे. (six year old boy murder by mother and her boyfriend lengre khanapure sangli)

हे वाचलं का?

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील ज्योती प्रकाश लोंढे (वय 28) या विवाहितेचे जोंधळखिंडी येथील रुपेश नामदेव घाडगे (वय 25) सोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात ज्योती लोंढे या विवाहितेचा 6 वर्षाचा मुलगा अडसर ठरत होता. त्यामुळे आईने प्रियकरासह मुलाच्या हत्येचा कट रचला.

प्राथमिक माहितीनुसार, ज्योती प्रकाश लोंढे आणि रुपेश घाडगे यांना लग्न करायचे होते. परंतू ज्योतीचा 6 वर्षीय मुलगा शौर्य प्रकाश लोंढे याच्यामुळे या दोघांना अडचण होत होती. त्यामुळे या दोघांनी आपली अडचण दूर करण्यासाठी कटकारस्थान रचून शौर्य लोंढे याचा अपहरण झाल्याचा बनाव केला होता. त्यानुसार 6 मे रोजी विटा पोलीस ठाण्यात आईने आपला मुलगा शौर्य याचे लेंगरे येथून अपहरण झाल्याची फिर्याद दिली होती.

या घटनेत ज्योती लोंढेच्या मदतीने रुपेश हा शौर्यला आपल्या दुचाकीवरून घेऊन गेला. यानंतर ढोराळे रस्त्यावरील एका विहिरीत शौर्यला फेकून देण्यात आले. यानंतर शौर्यचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर विटा पोलीसांना या प्रकाराबाबत संशय आला होता. त्यानुसार विटा पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेल्या पोलीस निरीक्षक यादव यांच्या पथकाने या घटनेचा तपास सुरू केला. त्यानुसार तपासात अनेक खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत.

पोलिसांनी या प्रकरणात आईची कसून तपास केला असता या घटनेचा उलगडा झाला. आईने पोटच्या मुलाच्या अपहरणाचा डाव रचला आणि प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी केवळ तीन दिवसात विटा पोलिसांनी धडक कारवाई करत हा मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे.

याप्रकरणी आता विटा पोलिसांनी ज्योती लोंढे (वय 28) आणि प्रियकर रुपेश नामदेव घाडगे (वय 25) यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

    follow whatsapp