Baramati Lok Sabha Election 2024 : 'सुनेत्रा पवार निवडून येणार', शिवतारेंनी कशी घेतली माघार?

मुंबई तक

30 Mar 2024 (अपडेटेड: 30 Mar 2024, 03:33 PM)

Vijay Shivtare : बारामती लोकसभा मतदार संघात शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरूद्ध बंडाचा झेंडा फडकावला होता. मात्र आता विजय शिवतारे यांचे बंड शमलं आहे.

baramati lok sabha election 2024 vijay shivtare ajit pawar sunetra pawar candidate mahayuti maharashtra politics

विजय शिवतारे यांचे बंड शमलं आहे.

follow google news

Baramati Lok Sabha Election 2024, Vijay Shivtare : : बारामती लोकसभा मतदार संघात शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरूद्ध बंडाचा झेंडा फडकावला होता. मात्र आता विजय शिवतारे यांचे बंड शमलं आहे. त्यामुळे ''आता सर्व कटूता बाजूला सारून बारामतीतून सूनेत्रा पवार यांना बहुमताने निवडून आणू'',अशी भूमिका विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी घेतली आहे. त्यामुळे अजित पवारांना (Ajit Pawar) दिलासा मिळाला आहे, तर बारामतीत शरद पवारांच्या (Sharad Pawar) अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  (baramati lok sabha election 2024 vijay shivtare ajit pawar sunetra pawar candidate mahayuti maharashtra politics)  

हे वाचलं का?

विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ''माझी मुख्यमंत्र्यांशी फोनवर व दोनदा प्रत्यक्ष चर्चा झाली होती. तरीही माझी भूमिका मी बदलली नव्हती. त्यानंतर मला मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकर यांचा फोन आला. माझ्या भुमिकेमुळे मुख्यमंत्री आणि महायुतीची अडचण होत होती. सर्वच ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे राहिले तर 10-12 खासदार पडतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे'', असे मला सांगण्यात आल्याचे शिवतारे यांनी यावेळी सांगितले. 

हे ही वाचा : 'ठाकरेंची साथ सोडणार का?' दानवेंनी झटक्यात संपवला विषय!

दरम्यान 28 मार्चला आमची एक बैठक देखील पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री उपस्थित होते. मी त्यांच सर्वकाही ऐकून घेतलं आणि त्यांना आपली बाजू देखील समजावून सांगितली. माझ्या मतदार संघातल्या प्रमुख मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या, असे शिवतारेंनी सांगितले. 

माझं आयुष्य हे माझा मतदार संघ आणि राज्याला समर्पित आहे. आमच्या या तहातून काही गोष्टी चांगल्या  झाल्यावर मला आनंदच होईल. शेवटी आम्ही राजकारण हे लोकांच्या हितासाठी करतो, असे शिवतारे म्हणाले. आता सर्व कटूता बाजूला सारून बारामतीतून सूनेत्रा पवार यांना बहुमताने निवडून आणू,अशी भूमिका विजय शिवतारे यांनी घेतली. 

हे ही वाचा : ‘घड्याळ’ नको तर ‘कमळ’ हवं, माजी IAS ची थेट मागणी?

दरम्यान आता शिवतारेंनी माघार घेतल्याने आता थेट सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी थेट लढत होणार आहे. त्यात आता महादेव जानकर देखील महायुतीत सामील झाल्याने सुप्रिया सुळेंना निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp