Hemant Patil : शिंदेंनी नाव जाहीर करून कापलं तिकीट, हिंगोलीत कुणाला दिली उमेदवारी

ऋत्विक भालेकर

03 Apr 2024 (अपडेटेड: 03 Apr 2024, 04:25 PM)

Hingoli Lok Sabha Election Hemant Patil, Baburao Kadam: हिंगोली लोकसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबुराव कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे हिंगोलीतून हेमंत पाटील यांचा पत्ता कट झाला आहे. दरम्यान याआधीच या जागेवर हेमंत पाटलांच नाव जाहीर करण्यात आले होते.

hingoli lok sabha election 2024 hemant patil candidancy cancel baburao kadam new candidate mahayuti lok sabha seat sharing

हिंगोली लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाबुराव कदम कोहळीकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

follow google news

Hingoli Lok Sabha Election Hemant Patil, Baburao Kadam:हिंगोली लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाबुराव कदम कोहळीकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे हिंगोलीतून हेमंत पाटील यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान याआधीच या जागेवर हेमंत पाटलांनच उमेदवारीसाठी नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र आता त्यांच तिकीट कापण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.(hingoli lok sabha election 2024 hemant patil candidancy cancel baburao kadam new candidate mahayuti lok sabha seat sharing) 

हे वाचलं का?

हिंगोलीत हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध होता. या विरोधातून गेल्या काही दिवसांपासून हिंगोली लोकसभा मतदार संघातून शिंदेसेनेचा उमेदवार बदलला जावा यासाठी युद्धपातळीवर हालचाली सूरू झाल्या होत्या. या हालचालीनंतर मंगळवारी हेमंत पाटील यांनी 200 ते 300 समर्थकांसह वर्षा बंगला गाठला होता. यावेळी हेमंत पाटलांची रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यासोबत चर्चा झाली होती. या भेटीत हेमंत पाटील यांच्यावर पक्ष कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, असा मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना शब्द देऊन शांत केले होते.

हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंची रणरागिणी मैदानात

दरम्यान अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृत घोषणा जरी केली नसली तरी  बाबुराव कदम कोहळीकर यांनी कामाला सूरूवात केली आहे. सोशल मीडियावर कदमांचे पोस्टर्स व्हायरल होत आहेत. तसेच उद्या 4 एप्रिलला बाबुराव कदम उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत. 

तसेच आज हेमंत पाटलासंर्भात दुसरा अहवाल समोर येणार आहे. या अहवालानंतर हेमंत पाटलांच्या उमेदवारीवर संध्याकाळपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. जर हा निकाल हेमंत पाटलांच्या विरोधात आल्यास शिंदेसेनेकडून हिंगोलीतून बाबूराव कदम यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांचे तिकीट कापले जाणार आहे. 

कोण आहेत बाबुराव कदम? 

बाबुराव कदम 2014 ला  हदगांव हिमायत नगरमधून त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता.

2019 मध्ये त्यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून हदगांव हिमायत नगरमधून अपक्ष विधानसभा लढवली होती.
 
बाबुराव कदम हे शिवसेना नांदेडचे  5 वर्ष जिल्हाप्रमुख होते, आता शिंदे गटाचे नांदेडचे जिल्हाप्रमुख आहेत.

हे ही वाचा : NCP : "चुकीचा अर्थ...", अजित पवार गटाचे सुप्रीम कोर्टाने टोचले कान

दरम्यान आता भापजच्या विरोधाला डावलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेमंत पाटील यांना उमेदवारी देतात की बाबुराव कदम यांना लोकसभेचे तिकीट देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 

    follow whatsapp