NCP : "चुकीचा अर्थ...", अजित पवार गटाचे सुप्रीम कोर्टाने टोचले कान

मुंबई तक

Sharad Pawar group moves Supreme Court against Ajit Pawar group : अजित पवार गटाने दिलेल्या जाहिरातीवर आक्षेप घेत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने अजित पवार गटाला स्पष्ट निर्देश दिले.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हाचा वाद... सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रवाद काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाचा वाद

point

शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

point

अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने सुनावलं

Supreme Court NCP Crisis : घड्याळ चिन्हाबद्दल दिलेल्या जाहिरातीवरून सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाचे कान टोचले. अजित पवार गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीवर आक्षेप घेत शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटावर ताशेरे ओढले. 

मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा याचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र, निवडणुका असल्याने सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला तुतारी हे निवडणूक चिन्ह दिले, तर अजित पवार गटाकडे घड्याळ हे चिन्ह कायम ठेवले. पण, घड्याळ चिन्हाचा प्रचार करताना सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला काही निर्देश दिलेले आहेत. त्याच उल्लंघन झाल्याचे शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टाला सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ वाद : सुप्रीम कोर्टात काय झालं?

अजित पवार गटाने 'घड्याळ' चिन्हाचा वापर न्यायप्रविष्ट असल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन केले नसल्याचा आरोप करत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायमूर्ती सूर्य कांत आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंठपीठासमोर यावर सुनावणी झाली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp