Lok Sabha Election 2024 : श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंची रणरागिणी मैदानात, कोण आहेत वैशाली दरेकर?

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

lok sabha election 2024 udhhav thackeray declare kalyan dombivali candidate vaishali darekar vs shrikant shinde cm eknath shide karan pawar jalgaon
कल्याणमधून ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे.
social share
google news

Who is Vaishali Darekar, Kalyan Dombivali Candidate  : कल्याण लोकसभा मतदार संघातून अखेर उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केली आहे. कल्याणमधून ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विरूद्ध ठाकरेंच्या वैशाली दरेकर यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान आता श्रीकात शिंदेंविरूद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या वैशाली दरेकर नेमक्या कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (lok sabha election 2024 udhhav thackeray declare kalyan dombivali candidate vaishali darekar vs shrikant shinde cm eknath shide karan pawar jalgaon)  

कल्याण-डोंबिवली मतदार संघातून ठाकरे श्रीकांत शिंदे विरूद्ध एक आक्रमक चेहरा मैदानात उतरवण्याची तयारीत होती. यासाठी त्यांनी शिंदेंविरूद्ध आक्रमक भाषण करणाऱ्या सुषमा अंधारेंना मैदानात उतरवण्याची व्यूहरचना आखली होती. मात्र अंधारेचा त्याला नकार होता.पण आता ठाकरेंना कल्याण-डोंबिवलीतून हवा तसा उमेदवार सापडला आहे. वैशाली दरेकर देखील शिंदेंविरोधात आक्रमक विधाने करत असतात. एक आक्रमक उमेदवार आणि अभ्यासू चेहरा म्हणून त्यांना ठाकरेंनी मैदानात उतरवले आहे.

हे ही वाचा : NCP : "चुकीचा अर्थ...", अजित पवार गटाचे सुप्रीम कोर्टाने टोचले कान

ठाकरेंच्या उमेदवार कोण? 

वैशाली दरेकर याआधी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंसोबत होत्या. त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी सर्वांत तरुण नगरसेविका म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतर दरेकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी डोंबिवली महापालिकेतील नगरसेवक आणि विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान  2009 मध्ये त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. ज्यामध्ये त्यांना 1 लाखांहून अधिक मते मिळाली. 

हे ही वाचा : किरण सामंतांची आधी माघार, नंतर पोस्ट का डिलीट केली?

कल्याण मधला एक आक्रामक आणि अभ्यासू चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच शिंदेविरोधात त्या नेहमीच आक्रामक भूमिका मांडत असतात. त्यामुळेच आता त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. आता जर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडुन जर श्रीकांत शिंदे यांना कल्याण मधून उमेदवारी जाहीर झाली तर वैशाली दरेकर त्यांना लोकसभेत किती तगडी टक्कर देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT