Lok Sabha election 2024 : "असले प्रकार मला चालणार नाही", जयंत पाटलांनी दिला दम

मुंबई तक

11 Apr 2024 (अपडेटेड: 11 Apr 2024, 12:55 PM)

Jayant Patil Speech news : जयंत पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झालेल्या एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दम दिला.

follow google news

Jayant Patil Latest News : (स्वाती चिखलीकर, सांगली) "आपण सर्वांनी खूप निवडणुका पहिल्या आहेत; पण निवडणूक सगळ्यात वेगळी आहे. कदाचित ही निवडणूक आपल्या देशासाठी शेवटची निवडणूक राहील", असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगलाच दम दिला.

हे वाचलं का?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथे महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या काळात विरोधकांपासून दूर राहण्यास सांगितले. 

जयंत पाटील मेळाव्यात काय बोलले?

जयंत पाटील म्हणाले, "सत्यजित पाटील सरुडकर हे नवा उमेदवार मशाल चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर आलेला आहे. आपण सर्वांनी घासून पुसून काम करायचं आहे."

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे म्हणाले, "तुमच्या घरी कोण येऊन चहा घेऊन गेलं. असले प्रकार मला चालणार नाही. ते आले. घरात बसले, आम्ही काय करू? तसला धंदा जरा बंद करा. अचानक आले."

हेही वाचा >> "काँग्रेस नेत्यांनी कठोर भूमिका घ्यायला हवी होती"; गायकवाडांनी सोडलं मौन

"ते घरी आले, तर तुम्ही घरात जाऊ नका. तुम्ही घराच्या बाहेर जावा. कळलं का? पण, त्यांना चहा पाजत बसायचा धंदा... आता निवडणूक चालू आहे. निवडणूक चालू आहे म्हणजे निवडणूकच. तुमचे कोण, काय संबंध असतील ते निवडणुकीनंतरच", अशा शब्दात जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.

हेही वाचा >> पवारांचा मल्ल.. शशिकांत शिंदेंना हलक्यात घेणं उदयनराजेंना जाणार जड? 

"आपली विधानसभेच्या आधीची ही रंगीत तालीम आहे. त्यामुळे आपल्या बूथवर परफेक्ट नियोजन करा. कोणत्याही परिस्थिती आपल्याला बूथवर प्लस झालंच पाहिजे", असे सांगत जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचेही संकेत दिले. 

खबरदारी घ्या -जयंत पाटील

"कोणत्याही गोष्टीला गृहीत धरू नका. जे काम केले त्याचे श्रेयही घेतले जात आहे. जे काम नाही केले त्याचेही श्रेय घेतले जात आहे. त्यामूळे बुथ कमिट्यांच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक घरात सत्याच्या आधारे जनजागृती करा. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत रणनीती आखावी. आपला उमेदवार निवडून येईल याची संपूर्ण खबरदारी घ्यावी", असे जयंत पाटील कार्यकर्त्यांना म्हणाले.

    follow whatsapp