Varsha Gaikwad : "काँग्रेस नेत्यांनी कठोर भूमिका घ्यायला हवी होती"; गायकवाडांनी सोडलं मौन
Maha Vikas Aghadi Varsha Gaikwad : मुंबईतील दोनच जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. याबद्दलची नाराजी वर्षा गायकवाड यांनी बोलून दाखवली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वर्षा गायकवाड यांनी सांगितलं नाराजीचं कारण
नाना पटोले यांच्याबद्दल नाराजी
महाविकास आघाडीच्या जागावाटपावर केलं भाष्य
Maharashtra Congress Lok Sabha election 2024 : महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला काही जागांवर तडजोड करावी लागली. यात मुंबईतील काँग्रेसला हव्या असलेल्या जागा ठाकरेंच्या सेनेने घेतल्या. त्यामुळे वर्षा गायकवाड नाराज झाल्या आहेत. अखेर त्यांनी यावर मौन सोडलं. वर्षा गायकवाड यांनी नाना पटोले यांच्याकडे अप्रत्यक्षपणे बोट दर्शवलं आहे.
मुंबईत वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाराजीच्या मुद्द्यावर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, "मी माझं मत पक्षश्रेष्ठींकडे सांगितलं आहे. बैठकांमध्येही सांगितलं. त्याचबरोबर पत्र लिहूनही कळवलं आहे. मी सातत्याने महाराष्ट्रातील नेते, दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भावना सांगितल्या होत्या."
त्या पुढे म्हणाल्या की, "माझी हीच अपेक्षा होती की, जागावाटपात आम्हाला आमचे हक्क मिळाले पाहिजेत. भलेही आमचे काही नेते गेले असले, तरी पक्ष संघटना आमची मुंबईमध्ये मजबूत आहे. आम्हाला ही अपेक्षा होती की कमीत कमी तीन किंवा दोन जागा मिळाव्यात. आम्ही बरोबरीत आहोत."
आम्ही पक्षाचा निर्णय स्वीकारला -वर्षा गायकवाड
"आम्ही आमच्या पक्षाला सांगितलं. आमच्या पक्षाने भूमिका घेतली आहे. पक्षाने एकदा भूमिका घेतल्यानंतर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणं आमची नैतिक जबाबदारी आहे. मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि म्हणून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही स्वीकार केलेला आहे. येणाऱ्या काळात आम्ही कामाला लागू. आमचं काहीही म्हणणं असलं, तर पक्षश्रेष्ठीला कळवू", अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी मांडली.










