मोठी बातमी! राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार 

मुंबई तक

sunetra Pawar : अजितदादांच्या निधनानंतर राज्याच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची जागा आता रिकामी झाली आहे. त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे. सुनेत्रा पवार उद्या 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

sunetra Pawar
sunetra Pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार 

point

सुनेत्रा पवारांविषयी थोडक्यात घ्या जाणून

Sunetra Pawar : अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी सकाळी बारामतीत विमान अपघातात निधन झालं. या घटनेनं महाराष्ट्र पोरका झाला आहे. राज्यातील जनतेनं देखील हळहळ व्यक्त केली. अजितदादांच्या निधनानंतर राज्याच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची जागा आता रिकामी झाली आहे. त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे. सुनेत्रा पवार उद्या 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.  

हे ही वाचा : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? फडणवीसांसोबत राष्ट्रवादीची बैठक, प्रफुल पटेलांनी सांगितलं...

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या 31 जानेवारी रोजी शनिवारी सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती समोर आली आहे. शपथेनंतर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील. 

हे ही वाचा : पुणे: अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये "अजित सृष्टी" उभारणार! भाजप आमदार महेश लांडगे यांची मागणी

सूत्रांनुसार, 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी पक्षाला दिशा देण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी बढती देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. पवार कुटुंबातील या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दर्शवला आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp