Vikas Thakre vs Nitin Gadkari Lok Sabha Elections 2024 : नागपूर लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपचे विद्यमान खासदार नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने विद्यमान आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विकास ठाकरे नेमके कोण आहेत, हेच जाणून घ्या... (Who is Vikas Thakre?)
ADVERTISEMENT
नागपूर लोकसभा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, याबद्दलची उत्सुकता संपली आहे. नितीन गडकरी यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरेंचे नाव काँग्रेसने जाहीर केले.
कोण आहेत विकास ठाकरे?
विकास ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत. ते नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेसचे शहराध्यक्षही आहेत. २००२ मध्ये नगरसेवक, महापौर आणि नंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
हेही वाचा >> 'अजित पवार विंचू'; शिवतारेंनी फुंकलं रणशिंग; पुढचा प्लॅन काय?
२०१९ मध्ये विकास ठाकरे यांना पश्चिम नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आणि ते विजय झाले. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते विलासराव मुत्तेमवार यांचे समर्थक असलेल्या विलास ठाकूर यांची धाडशी आणि धडाकेबाज नेता अशी ओळख आहे.
ओबीसी नेते... विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश
विकास ठाकरे हे ओबीसी समुदायातून येतात. त्यांचे बी.कॉम पर्यंत शिक्षण झालेले आहे. १९८५ मध्ये विकास ठाकरे काँग्रेस पक्षासोबत जोडले गेले. ते १९८८ मध्ये राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या नागपूर शहराचे महासचिव बनले.
१९९० मध्ये ते शहर युवक काँग्रेसचे महासचिव बनले. १९९८ मध्ये विकास ठाकरेंवर विदर्भ काँग्रेसचे अध्यक्ष बनले. त्यानंतर २००२ मध्ये ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.
हेही वाचा >> अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान? जाहिरात वादात!
२००२ ते २००५ या काळात ते नागपूरचे महापौर होते. २०१० मध्ये नागपूर महापालिकेत ते विरोधी पक्षनेते बनले. त्यानंतर पुढे २०१२ मध्ये ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१२ ते २०१७ या काळात विकास ठाकरे यांनी महापालिकेत पुन्हा विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिले.
२०१४ पासून ते नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकले. विकास ठाकरे हे न्यू महालक्ष्मी अर्बन क्रेडिट सोसायटीचेही अध्यक्ष आहेत.
ADVERTISEMENT