Vijay Shivtare : 'अजित पवार विंचू'; शिवतारेंनी फुंकलं रणशिंग; पुढचा प्लॅन काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

vijay shivtare criticize ajit pawar  contest from baramati lok sabha election constituency cm eknath shinde meeting mumbai mahayuti supriya sule vs sunetra pawar
येत्या 12 एप्रिलला 12 वाजता आपण लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार आहे.
social share
google news

Vijay Shivtare Criticize Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीमधील शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात बंड करण्याची तयारी सूरू केली आहे. शिवतारेंचे हे बंड थंड करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुसऱ्यांदा प्रयत्न केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. कारण शिवतारेंनी लोकसभा लढवणार असल्याचा ठाम भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता बारामतीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.  (vijay shivtare criticize ajit pawar 
contest from baramati lok sabha election constituency cm eknath shinde meeting mumbai mahayuti supriya sule vs sunetra pawar) 

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज दुसऱ्यांदा शिवतारेंनी भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना माघार घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र शिवतारेंनी आपल्या भूमिकेत तसूभर ही फरक पडू न देता लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची ठाम भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शिवतारेंनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. 

हे ही वाचा : NCP : अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान? जाहिरात वादात!

येत्या 12 एप्रिलला 12 वाजता आपण लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार आहे. आणि पार्श्वीशक्तीचे 12 वाजवणार असल्याचा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे. राष्ट्रवादीने ग्रामीण दहशत पोसलीय, सगळ्या यंत्रणा त्यांच्या हाती आहेत. या सगळ्या दहशताचा उगम करणारे शरद पवार आहेत. आणि ही दहशत संपूर्ण महाराष्ट्रात सुरु ठेवण्याचा काम अजित पवारांनी करत असल्याची टीका विजय शिवतारे यांनी केली. 

हे वाचलं का?

विजय शिवतारेंनी यावेळी सुप्रिया सुळेंवरही जोरदार टीका केली. सुप्रिया सुळेंनी 15 वर्ष खासदारकी केली, म्हणे मला 9 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाली. लोकसभेत 98 टक्के उपस्थिती आहे. पण 2 टक्के काम सुद्धा अख्ख्या मतदार संघात नाही. त्यामुळे एका बाजूला निष्क्रिय खासदार आणि कुणाची मुलगी आहे म्हणून चालणार नाही, असे म्हणत शिवतारेंनी सुप्रिया सुळेंवरही टीका केली.

हे ही वाचा : लोकसभा निवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम'! जरांगेंचा प्लॅन तयार

दरम्यान एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल. ग्रामीण भागात प्रचंड दहशतवाद आहे. हा विंचू अनेकांना डसलाय आणि आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला...त्यामुळे विंचुरूपी शक्ती अजित पवार नव्हे, दोन शक्तीचा बिमोड आपल्याला करावा लागेल, असा इशारा देखील विजय शिवतारे यांनी दिला. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT