धाराशिवमध्ये धाकधूक वाढवणारी मतमोजणी, पंचायत समितीच्या निवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवाराचा एका मताने विजय

मुंबई तक

Dharashiv Politics : अवघ्या एका मताच्या फरकाने लागलेल्या या निकालामुळे ढोकी गणाचा निकाल राज्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, ढोकी जिल्हा परिषद गटात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले. या गटातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार तीर्थराज घाडगे यांनी १,२०० हून अधिक मतांनी स्पष्ट बहुमत मिळवत विजय नोंदवला.

ADVERTISEMENT

Dharashiv Politics
Dharashiv Politics
Google CTA

बातम्या हायलाइट

point

धाराशिवमध्ये धाकधूक वाढवणारी मतमोजणी

point

ठाकरेंच्या उमेदवाराचा एका मताने विजय, भाजपचा पराभव

धाराशिव, गणेश जाधव : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पंचायत समिती गणाचा निकाल विशेष लक्षवेधी ठरला आहे. येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निहाल काझी यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अमर समुद्रे यांनी विजय मिळवला. ढोकी पंचायत समिती गणातील मतमोजणी प्रक्रिया चुरशीची राहिली. प्रत्येक फेरीत मतांची आघाडी कमी-अधिक होत राहिल्याने निकाल शेवटच्या टप्प्यापर्यंत स्पष्ट झाला नाही. अंतिम फेरीअंती केवळ एका मताच्या फरकाने निकाल लागला.

अंतिम मतमोजणीनुसार,

अमर समुद्रे (शिवसेना उद्धव गट) : ३,१८७ मते
 निहाल काझी (भाजप) : ३,१८६ मते

हेही वाचा : विधानसभेचा बदला घेतला! 4 महिन्यांच्या बाळ सोबत घेऊन लढल्या, राम सातपुतेंच्या पत्नीनं जानकरांच्या मुलाला हरवलं

हे वाचलं का?