दोन्ही शिवसेना अन् राष्ट्रवादी एकत्र आणल्या तरीही दिलीप सोपलांचा सुपडा साफ, राजेंद्र राऊतांचा 18-0 ने दणदणीत विजय
Barshi Politics : बार्शीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत आणि विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्यामध्ये पारंपारिक लढत दिसून आली. या निवडणुकीत राऊत गटाने सोपल गटाचा सुपडा साफ केल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोपलांना त्यांचा एकही उमेदवार निवडून आणता आला नाही
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन्ही शिवसेना अन् राष्ट्रवादी एकत्र आणल्या तरीही दिलीप सोपलांचा सुपडा साफ
राजेंद्र राऊतांचा 18-0 ने दणदणीत विजय
Barshi Politics : सोलापुरातील बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्र आल्या होत्या. दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्रित येऊन महाआघाडीची स्थापना केली होती. महाआघाडी स्थापन करण्यासाठी ठाकरे शिवसेनेचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी पुढाकार घेतला होता. बार्शीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत आणि विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्यामध्ये पारंपारिक लढत दिसून आली. या निवडणुकीत राऊत गटाने सोपल गटाचा सुपडा साफ केल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोपलांना त्यांचा एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्र राऊत यांना पाठबळ देत भाजपला स्वबळावर लढण्याचा आदेश सूचित केला होता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महाआघाडी विरोधात जोरदार प्रचार केला होता.
बार्शी तालुक्यात एकूण 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गणांच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. माजी आमदार व देवेंद्र फडणवीसांचे समर्थक राजेंद्र राऊत यांच्याकडे भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी होती. दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीवर भारी पडत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. बार्शीतील 6 जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समितीच्या 12 गणात भाजपने म्हणजेच राजेंद्र राऊतांच्या गटाने बाजी मारली. भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना कमी पडलेत की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः बार्शीतील वैराग येथे जाहीर सभा घेत महाआघाडीचा प्रचार केला होता.
बार्शीत भाजपविरोधात महाआघाडी स्थापना केली होती
संपूर्ण राज्याचं बार्शीच्या निकालाकडे लक्ष होते. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय बार्शीचे भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना शह देण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याने सोलापूर जिल्ह्यात मोठी चर्चा होती. भाजपच्या विरोधात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी असे एकूण 4 पक्ष एकत्र येऊन महाआघाडी स्थापन केली होती. दोनच महिन्यापूर्वी बार्शी नगरापरिषदेवर भाजप नेते व माजी आमदार राजेंद्र राऊंतांच्या नेतृत्वात भाजपची एकहाती सत्ता आली होती. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागेवर भाजप नेते राजेंद्र राऊंत यांचा चा विजय झाला होता. आता बार्शी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या 18 पैकी 18 जागेवर राऊंतांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.
जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवार










