आत्महत्येसाठी नाही; तर 'त्या' चार मित्रांनी नशेसाठी प्यायले होते कीटकनाशक, जीवंत मित्राचा धक्कादायक खुलासा

मुंबई तक

Crime News : बिहारमधील चार मित्रांनी एकत्रितरीत्या विष प्राशन केल्याची घटना घडली होती.  यामधील तिघांचा मृत्यू झाला होता. यानंतर जीवंत राहिलेल्या मित्राने या घटनेविषयी खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, आम्ही आत्महत्येसाठी नाही तर नशेसाठी कीटकनाशक प्राशन केले होते. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून तरुणांच्या या विचित्र नादाविषयी टीकादेखील होत आहे. या मित्रांनी मिळून फेराडोन नावाचे एक कीटकनाशक नशेसाठी प्राशन केले होते.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आत्महत्येसाठी नाही; तर 'त्या' चार मित्रांनी नशेसाठी प्यायले होते कीटकनाशक

point

जीवंत मित्राचा धक्कादायक खुलासा

Crime News : बिहारमधील चार मित्रांनी एकत्रितरीत्या विष प्राशन केल्याची घटना घडली होती.  यामधील तिघांचा मृत्यू झाला होता. यानंतर जीवंत राहिलेल्या मित्राने या घटनेविषयी खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, 'आम्ही आत्महत्येसाठी नाही तर नशेसाठी कीटकनाशक प्राशन केले होते.' यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून तरुणांच्या या विचित्र नादाविषयी टीकादेखील होत आहे. या मित्रांनी मिळून 'फेराडोन' नावाचे एक कीटकनाशक नशेसाठी प्राशन केले होते.

हे ही वाचा : एकीकडे ममता बॅनर्जींचा लढा; तर दुसरीकडे सर्वसामान्य गमावताहेत जीव! SIR सुनावणीला जाताना शिक्षकाच्या कुटुंबाचा करुण अंत

काय घटना घडली होती?

बिहारच्या सहरसा जिल्ह्यात नशेच्या एका विचित्र नादाने तीन कुटुंबांतील कर्ते तरुण हिरावले गेले आहेत. फरेबा टोला येथे शनिवारी (7 फेब्रुवारी) चार मित्रांनी एकत्र येत कीटकनाशक प्यायले. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर तिसरा मित्र मुरारी कुमार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या चौथा मित्र सनोज कुमार याच्यावर खगडिया जिल्ह्यात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

व्हिडीओद्वारे धक्कादायक खुलासा

सुरुवातीला हा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न असावा असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सनोज कुमारने एका व्हिडिओद्वारे धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला नव्हता, तर केवळ नशा करण्यासाठी 'फेराडोन' या कीटकनाशकाचे सेवन केले होते. या कीटकनाशकामुळे आपला जीव जाईल, याची पुसटशी कल्पनाही या तरुणांना नव्हती. नशेची ही कल्पना त्यांच्या जीवावर बेतली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp