एकीकडे ममता बॅनर्जींचा लढा; तर दुसरीकडे सर्वसामान्य गमावताहेत जीव! SIR सुनावणीला जाताना शिक्षकाच्या कुटुंबाचा करुण अंत
SIR Process : एसआयआरच्या सुनावणीसाठी जाताना एका शिक्षकाला आपली पत्नी आणि 9 महिन्यांची मुलगी गमवावी लागली आहे. कागदपत्रांमधील नावांच्या दुरुस्ती करण्याच्या सुनावणीला ते निघाले होते. त्यासाठी जाताना तिघं ज्या रिक्षातून जात होते त्या रिक्षाचा अपघात झाला. यामध्ये त्या शिक्षकाच्या पत्नीचा आणि 9 महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, या शिक्षकाला मृतदेह शवागरात ठेवून सुनावणीसाठी जावे लागले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एकीकडे ममता बॅनर्जींचा लढा तर दुसरीकडे सर्वसामान्य गमावताहेत जीव!
SIR सुनावणीला जाताना शिक्षकाच्या कुटुंबाचा करुण अंत
SIR Process : पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेवरुन जोरदार गदारोळ सुरु आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याविरोधात आक्रमकपणे लढा देत आहेत. वकील असल्याने त्यांनी स्वत:च याप्रकरणी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. कोर्टात त्यांनी या प्रक्रियेला 'छळ करण्याचं साधन' असं म्हटलं. या एसआयआर प्रक्रियेत सहभागी झालेल्या अनेक अधिकाऱ्यांचा कामाच्या तणावामुळं मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या. यामुळे सबंध देशभर गदारोळ माजला. याविषयी आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
एसआयआरच्या सुनावणीसाठी जाताना एका शिक्षकाला आपली पत्नी आणि 9 महिन्यांची मुलगी गमवावी लागली आहे. कागदपत्रांमधील नावांच्या दुरुस्ती करण्याच्या सुनावणीला ते निघाले होते. त्यासाठी जाताना तिघं ज्या रिक्षातून जात होते त्या रिक्षाचा अपघात झाला. यामध्ये त्या शिक्षकाच्या पत्नीचा आणि 9 महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, या शिक्षकाला मृतदेह शवागरात ठेवून सुनावणीसाठी जावे लागले. अशा भयानक पद्धतीने सुखी संसाराचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील ही घटना आहे.
हे ही वाचा : चक्क हॉटेलमध्ये सापडल्या मतदान पेट्या, अधिकारी म्हणाला, माझी चूक झाली!; सोलापुरात राष्ट्रवादी आक्रमक
सुनावणीसाठी जाताना अपघात
मोहम्मद यासीन अन्सारी नावाचे एक शिक्षक आपली पत्नी हलीमा खातून आणि 9 महिन्यांच्या मुलीसह रिक्षाने अंबजारकडे जात होते. सुस्तानी भागात रिक्षावरील ताबा सुटल्याने तो उलटला आणि मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात हलीमा यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या चिमुकल्या मुलीने रुग्णालयात उपचार सुरु असताना प्राण सोडले. आपल्या डोळ्यादेखत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊनही, सुनावणीला उपस्थित राहणे अनिवार्य असल्याने अन्सारी यांना जड अंत:करणाने मृतदेह शवागारात ठेवून सुनावणी केंद्राकडे धाव घ्यावी लागली.










