लॉ कॉलेजमध्ये रक्तरंजित थरार! वर्गात गोळी झाडून तरुणीची हत्या अन् जागीच तरुणाची आत्महत्या... CCTV मध्ये कैद

मुंबई तक

लॉ कॉलेजच्या क्लासमध्ये एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गातील मैत्रिणीवर गोळी झाडून तिची हत्या केली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या धक्कादायक घटनेने कॉलेजच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

लॉ कॉलेजमध्ये रक्तरंजित थरार!
लॉ कॉलेजमध्ये रक्तरंजित थरार!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लॉ कॉलेजमध्ये रक्तरंजित थरार!

point

वर्गात गोळी झाडून तरुणीची हत्या अन् जागीच तरुणाची आत्महत्या... म

Crime News: लॉ कॉलेजच्या क्लासमध्ये एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गातील मैत्रिणीवर गोळी झाडून तिची हत्या केली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही सोमवारी (9 फेब्रुवारी) पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यात घडल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेने कॉलेजच्या परिसरात एकच खळबळ उडाली असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. 

वर्गात तरुणीवर झाडली गोळी अन् आत्महत्या.. 

संदीप कौर (20) अशी मृत तरुणीची ओळख समोर आली असून ती विधी प्रथम वर्षाची विद्यार्थीनी होती. तसेच, आरोपी तरुणाचं नाव प्रिन्स राज असल्याची माहिती आहे. संबंधित घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेल्या माहितीनुसार, क्लास सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थी वर्गात जमा होत होते आणि तेव्हा आरोपी प्रिन्स देखील वर्गात आला. त्यावेळी, पीडित संदीप ही तिच्या मैत्रिणीसोबत बाकावर बसली होती. दरम्यान, आरोपी तिच्याजवळ गेला आणि त्यांच्यात वाद झाला. हा वाद टोकाला पोहोचताच, अचानक प्रिन्सने त्याच्याजवळ असलेली पिस्तूल बाहेर काढली आणि थेट संदीपवर गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर, ती जमिनीवर कोसळली आणि प्रिन्सने लगेच पिस्तून पुन्हा लोड करून स्वत:वर गोळी झाडली. यामध्ये, दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

हे ही वाचा: डॉक्टर असल्याचं सांगून वॉर्ड बॉयनेच इंजेक्शन दिलं अन् महिलेचा मृत्यू... नवी मुंबईतील धक्कादायक घटना

पोलिसांनी दिली माहिती   

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, क्लास सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी ही भयानक घटना घडली. आता, पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासादरम्यान, एक विद्यार्थी पिस्तूल घेऊन कॉलेजमध्ये कसा घुसला? त्याने ते शस्त्र बेकायदेशीररित्या बाळगलं होतं का? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. 

हे ही वाचा: "तसं मोहनराव आपण कधी बोलणार?", राज ठाकरेंचं सरसंघचालकांना जोरदार प्रत्युत्तर; भाषिक आंदोलनास आजार म्हटल्याने संतापले

अधिकची माहिती अशी की, ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.  खरं तर, 8 फेब्रुवारी रोजी 'प्रपोज डे'चं औचित्य साधून आरोपीने संदीपकडे आपलं प्रेम व्यक्त केलं होतं, मात्र त्यावेळी पीडितेने त्याच्या प्रेमाला नकार दिल्यामुळे प्रिन्सने हे कृत्य केल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. आता, पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून याबाबतची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp