"तसं मोहनराव आपण कधी बोलणार?", राज ठाकरेंचं सरसंघचालकांना जोरदार प्रत्युत्तर; भाषिक आंदोलनास आजार म्हटल्याने संतापले

मुंबई तक

व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी भाषेवरुन होणाऱ्या भेदभावावर भागवतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हा स्थानिक आजार आहे आणि त्याला पसरण्यापासून रोखायला हवं असं मोहन भागवत म्हणाले. राज ठाकरेंनी एक्सवर एक पोस्ट लिहीत सडेतोड उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंचं सरसंघचालकांना जोरदार प्रत्युत्तर

point

भाषिक आंदोलनास आजार म्हटल्याने संतापले

point

राज ठाकरे यांची 'एक्स'वरील पोस्ट वाचा...

Raj Thackeray on Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत दोन दिवसांच्या व्यख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. दोन दिवसाच्या व्याख्यानमालेत दुसऱ्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी भाषेवरुन होणाऱ्या भेदभावावर भागवतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हा स्थानिक आजार आहे आणि त्याला पसरण्यापासून रोखायला हवं असं मोहन भागवत म्हणाले. भागवतांच्या या वक्तव्यानंतर राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंनी एक्सवर एक पोस्ट लिहीत सडेतोड उत्तर दिलं आहे. 'आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे' असं म्हणत भली मोठी पोस्ट लिहिली आहे. मोहन भागवतांच्या या उत्तरावर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घ्या. 

राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी 

८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं. 

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या ! 

असो . . . 

हे वाचलं का?

    follow whatsapp