डॉक्टर असल्याचं सांगून वॉर्ड बॉयनेच इंजेक्शन दिलं अन् महिलेचा मृत्यू... नवी मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबई तक

आरोपी वॉर्ड बॉयने स्वत: डॉक्टर असल्याचं सांगून महिलेला इंजेक्शन दिलं आणि त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. संबंधित महिला ही हॉर्मोनल डिसॉर्डरने पीडित होती. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

डॉक्टर असल्याचं सांगून वॉर्ड बॉयनेच इंजेक्शन दिलं

point

पीडित महिलेचा मृत्यू

point

नवी मुंबईतील धक्कादायक घटना

Crime News: नवी मुंबईतील वाशी पोलीस स्टेशन हद्दीतून वॉर्ड बॉयने डॉक्टर असल्याचं भासवून इंजेक्शन दिल्याने महिलेचा जीव गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी वॉर्ड बॉयला अटक केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वॉर्ड बॉयने स्वत: डॉक्टर असल्याचं सांगून महिलेला इंजेक्शन दिलं आणि त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. संबंधित महिला ही हॉर्मोनल डिसॉर्डरने पीडित होती. 5 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव संदेश पश्ते तो मानखुर्द येथील रहिवासी आहे. तसेच, तो अंधेरीत एका नर्सिंग होममध्ये वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत असल्याचं सांगितलं जात आहे. प्रकरणातील मृत महिलेचं नाव प्रचिती भुवड असून ती वाशी सेक्टर 11 च्या गिरधर निवास बिल्डिंगमध्ये राहत होती. दरम्यान, पीडितेचे वडील भीकूराम भुवड यांनी 6 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध बीएनएसच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

या प्रकरणाबाबत, वाशी एनएमएमसी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे म्हणाले की, हे वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचं प्रकरण असल्यामुळे महिलेच्या पोस्टमॉर्टमनंतर प्राथमिक शवविच्छेदन अहवालातील कारणाचा विचार केला जाईल. तसेच, व्हिसेरा नमुना हिस्टोपॅथॉलॉजीसाठी जतन करण्यात आला असून मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी तो कलिना एफएसएलला पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 

हे ही वाचा: मुंबई लोकलमध्ये बुरखा परिधान केलेला पुरुष महिलांच्या डब्यात, व्हिडिओ आला समोर

पीडितेच्या वडिलांनी दाखल केली तक्रार 

मृत महिलेच्या वडिलांनी याबाबत सांगितलं की त्यांच्या मुलीला पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (PCOD) होता आणि त्यांची भाची प्रियंका महाडिक हिने तिला संदेश पाश्ते यांच्याकडे उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. संदेश पाश्ते हा स्वतःला डॉक्टर असल्याचा दावा करत होता आणि उपचारांसाठी रुग्णांच्या घरी यायचा. प्रियंकाने यापूर्वी संदेश पाश्तेकडून अशाच आजारावर उपचार घेतले होते आणि तो आजार बरा देखील झाल्याचं तिने सांगितलं होतं. त्यानंतर, पीडित प्रचिती भुवडने 5 फेब्रुवारी रोजी संदेश पश्ते याच्याकडे उपचारासाठी अपॉइंटमेंट घेतली.

हे वाचलं का?

    follow whatsapp