रेवती सुळे यांचं लग्न ठरलं, सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई कोण?
Revati Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे. सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचं लग्न निश्चित झालंय. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि रेवती सुळेंच्या जवळच्या मैत्रीण स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भातली माहिती दिलीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं लग्न ठरलं
सुप्रिया सुळे यांचा होणारा जावई कोण? याची माहिती पुढीलप्रमाणे...
Revati Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे. सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचं लग्न निश्चित झालंय. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि रेवती सुळेंच्या जवळच्या मैत्रीण स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भातली माहिती दिलीय.
हे ही वाचा : डोंबिवलीत शाळेत जाताना सात वर्षाच्या मुलीवर 10 ते 15 कुत्र्यांनी केला हल्ला, घटनास्थळ हादरलं
सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई कोण?
मिळालेल्या माहितीनुसार, सारंग अरुण लखानी हे नागपूरचे आहेत. त्यामुळे रेवती सुळे नागपूरच्या सूनबाई होणार आहेत. सुप्रिया सुळेंचा होणारे जावई सारंग लखानी हे विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे डायरेक्टर आहेत. विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे ते पुत्र आहेत.
सारंग अरुण लखानी चांगले बॅडमिंटनपटू आणि बरंच काही...
सारंग अरुण लखानी हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे ते अध्यक्ष तर महाराष्ट्र ऑलिम्पिक अससोसिशनचे ते कोषाध्यक्षही आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून अरुण लखानी यांची ओळख आहे. गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मध्यस्थीनेच रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याचं बोललं जातंय.
हे ही वाचा : डॉक्टर असल्याचं सांगून वॉर्ड बॉयनेच इंजेक्शन दिलं अन् महिलेचा मृत्यू... नवी मुंबईतील धक्कादायक घटना
सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुलं आहेत. रेवती सुळे यांनी प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवीचे शि७ण पूर्ण केलेय. बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवलेला दिसून आला.