Lok Sabha 2024 : मराठा उमेदवारांमुळे महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर मतदान?

भाग्यश्री राऊत

08 Mar 2024 (अपडेटेड: 08 Mar 2024, 09:58 PM)

Lok Sabha Election 2024 EVM : मराठा समाजाने प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

follow google news

Lok Sabha Election 2024 : मनोज जरांगे यांचं समर्थन करण्यासाठी गावातून लोकसभा निवडणुकीत 3 उमेदवार देऊन त्याचा सर्व खर्च लोक वर्गणीतून करायचा आहे. हा ठराव आहे धाराशिव जिल्ह्यातील सावरगावमधला! एका गावातून 3 उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतलाय...हे झालं आहे फक्त एका गावात... पण, अख्ख्या मराठवाड्यातल्या प्रत्येक गावातून असे उमेदवार निवडणुकीला उभे करण्याचा निर्णय घेतलाय... म्हणजे एका जिल्ह्यातून हजारो उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असतील. मग इतके उमेदवार असतील तर ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेणं शक्य आहे का? ईव्हीएमच्या क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्यास मतदान बॅलेट पेपरवर घेतलं जाऊ शकतं का? (is it possible to conduct voting by EVM, if 1000 candidates contest lok sabha election)

एका गावातून किंवा एका ग्रामपंचायतीतून 3 उमेदवार निवडणुकीत अर्ज दाखल करणार असतील तर एकट्या धाराशिव जिल्ह्यात 622 ग्रामपंचयती आहेत. म्हणजे एकट्या धाराशिव जिल्ह्यातून 1800 पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असतील... 

ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा मुद्दा का आला चर्चेत?

कोणत्या जिल्ह्यात ही संख्या पाच हजारांच्या वरही जाऊ शकते... त्यामुळेच धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. या पत्रात नेमकं काय म्हटलंय? यावर एक नजर टाकुयात.... 

आरक्षणामुळे मराठा समाजाकडून लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकतात. अशा परिस्थितीत ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक घेण्यात अडचण येईल. मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करून निवडणूक घ्यायची झाल्यास तितकंच मनुष्यबळही लागणार आहे. उमेदवार जास्त झाल्यास मतपत्रित मोठी होईल आणि मतपेट्यांची संख्याही वाढेल...अशा परिस्थितीत काय करायचं असा प्रश्न धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला विचारलाय...

हेही वाचा >> 'लोकसभेच्या उमेदवारीसाठी नार्वेकरांनी...', ठाकरेंच्या विधानाने खळबळ

खरंच अशा परिस्थितीत काय करायचं? उमेदवार जास्त झाल्यास ईव्हीएमवर निवडणूक घेणं शक्य आहे का? मतदान बॅलेट पेपरवर शिफ्ट होऊ शकतं का? तर... निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, एका मशीनवर NOTA सह फक्त 16 उमेदवारांना समाविष्ट केलं जाऊ शकतं. असे 24  मशिन कंट्रोल युनिटने जोडून एक ईव्हीएमचा सेट तयार होतो. म्हणजे ईव्हीएमच्या एका सेटवर फक्त 384 उमेदवारांना समाविष्ट केलं जाऊ शकतं.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणातल्या निजामाबाद लोकसभा मतदारसंघात अशी परिस्थिती निर्माण झाली होती.  पण, तिथे 185 उमेदवार मैदानात होते. त्यामुळे अधिकचे ईव्हीएम युनिट जोडून मतदान घेणं शक्य झालं होतं. कारण, ईव्हीएमचा संच 384 उमेदवार समाविष्ट करून घेऊ शकतो. त्यामुळे असे युनिट जोडून निजामाबादमध्ये मतदान शक्य झालं होतं. पण, महाराष्ट्रात अगदी याऊलट परिस्थिती आहे. 

ईव्हीएमच्या मर्यादा काय आहेत?

महाराष्ट्रात एकाच लोकसभा मतदारसंघातून जवळपास २ हजारांपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असतील. त्यामुळे ईव्हीएमवर इतके उमेदवार कसे सामावून घेणार? ईव्हीएमवर मतदान घेणं शक्य होईल का? तर आमच्या माहितीनुसरा ईव्हीएमवर मतदान घेणं शक्य होणार नाही. 

हेही वाचा >>  राहुल गांधी 'या' मतदारसंघातून लढणार, 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

अशा परिस्थितीत त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं लागेल. कारण एक ईव्हीएमचा सेट फक्त 384 उमेदवारांना सामावून घेऊ शकतो. त्यापेक्षा उमेदवार वाढले तर मतदान बॅलेट पेपरवर घ्यावं लागणार आहे. उमेदवारांची संख्या जास्त असेल तर मतदान घेण्यास जास्त कालावधी सुद्धा लागू शकतो. पण, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्यकेच उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाईल असं नाही. काहींचे अर्ज बादही होतात. अर्ज बाद झाले आणि 384 पर्यंत उमेदवार असतील तर हे मतदान ईव्हीएम मशीनवरच घेतलं जाऊ शकतं.

    follow whatsapp