नाना पाटेकर यांचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य समोर

मुंबई तक

11 Oct 2026 (अपडेटेड: 11 Oct 2026, 08:12 PM)

Nana patekar Passed Away : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नाना पाटेकर यांच्या मृत्यूमागील खरं कारण आता समोर आले आहे. गोवा मेडिकल कॉलेज अँड रुग्णालयाच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी रविवारी या घटनेचा खुलासा केला.

Nana patekar Passed Away

Nana patekar Passed Away

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबाबत महत्त्वाची अपडेट

point

डॉक्टरांनी सांगितलं मृत्यूमागील कारण

Nana patekar Passed Away : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नाना पाटेकर यांच्या मृत्यूमागील खरं कारण आता समोर आले आहे. गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी रविवारी या घटनेचा खुलासा केला. शवविच्छेदनाच्या अहवालातून नानांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. हृदयाच्या मुख्य धमन्यांपैकी एका डाव्या बाजूच्या धमनीत रक्ताची गुठळी तयार झाली होती, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शिवसेना भवनाबाहेर राडा, आदित्य आणि तेजस ठाकरे मैदानात

डॉक्टरांनी सांगितलं मृत्यूमागील कारण

गोवा मेडिकल कॉलेजमधील एका विरिष्ठ डॉक्टरांच्या मते नाना पाटेकर यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्या शवविच्छेदनाच्या अहवालातून त्यांचा मृत्यू हा 'एथेरोस्क्लेरोटिक ऑक्लुझिव्ह कोरोनरी आर्टरी डिसीजमुळे झाला. डाव्या धमनीत रक्ताची गुठळी तयार होऊन झालेला तीव्र मायोकार्डियल इन्फार्क्शन' म्हणजेच हृदयविकाराचा झटका असे नमूद केले आहे. हृदयाच्या मोठ्या भागाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमनीत अचानक रक्ताची गुठळी तयार झाल्याने हा हृदयविकाराचा झटका आला होता. 

डॉक्टरांना नानांना वाचवण्यासाठी जवळपास 45 मिनिटे कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन (CPR) केले, परंतु सर्व प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. पहाटे 5.10 वाजण्याच्या दरम्यान त्यांना मृत घोषित केले होते, त्यानंतर त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. 

हे ही वाचा : लातूर: मुली घरातही असुरक्षित, दोन्ही लेकींवर बापाचा लैंगिक अत्याचार; आईनं पाहिलं

अत्यंसंस्कारासाठी दिग्गजांची उपस्थिती

त्यानंतर नाना पाटेकर यांचे सुपुत्र मल्हार पाटेकर गोव्याला पोहोचले आणि नानांचे पार्थिक घेऊन आले. त्यानंतर ते पार्थिक पुण्यात आणण्यात आले होते आणि तेथून डोंजे गावातील त्यांच्या फार्महाऊसवर नेले, जिथे त्यांना संपूर्ण शासकीय सन्मानाने अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळ, लोकसभा खासदार सुनील तटकरे, नाम फाऊंडेशनचे सह- संस्थापक आणि अभिनेते मकरंद अनासपुरे, एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे, अभिनेते जॅकी श्रॉप, तसेच राजकीय मंडळी आणि चित्रपट क्रिडा क्षेत्रातील कलाकार मंडळींनी त्यांना अखेरचा निरोप दिला.