महाराष्ट्रात दिवसभरात 67 हजारांपेक्षा जास्त Corona पॉझिटिव्ह रूग्ण, 676 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

• 03:37 PM • 24 Apr 2021

महाराष्ट्रात दिवसभरात 67 हजार 160 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 676 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 1.51 टक्के इतका झाला आहे. तर दिवसभरात राज्यात 63 हजार 818 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 34 लाख 68 हजार 610 कोरोना रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दिवसभरात 67 हजार 160 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 676 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 1.51 टक्के इतका झाला आहे. तर दिवसभरात राज्यात 63 हजार 818 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 34 लाख 68 हजार 610 कोरोना रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 82.2 इतका झाला आहे.

हे वाचलं का?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 54 लाख 60 हजार 8 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 42 लाख 28 हजार 836 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात 41 लाख 87 हजार 675 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 29 हजार 246 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 6 लाख 94 हजार 480 सक्रिय रूग्ण आहेत.

भारतात मे महिन्यात रोज पाच हजारांपेक्षा जास्त Corona मृत्यू होणार IHME चा अहवाल

राज्यात दिवसभरात 67 हजार 160 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्य 42 लाख 28 हजार 836 इतकी झाली आहे.दिवसभरात 676 मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 396 मृत्यू हे मागील 48 तासांमधील आहेत. तर 280 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

Corona ची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी का ठरते आहे?

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णसंख्या

मुंबई- 78 हजार 226

ठाणे- 80 हजार 492

पालघर-15 हजार 852

रायगड- 14 हजार 779

पुणे – 1 लाख 8 हजार 231

सातारा- 15 हजार 923

सांगली- 10 हजार 668

सोलापूर- 15 हजार 2

नाशिक- 42 हजार 381

अहमदनगर- 24 हजार 343

जळगाव- 13 हजार 487

औरंगाबाद- 15 हजार 176

बीड- 11 हजार 932

लातूर- 19 हजार 219

परभणी- 10 हजार 447

नांदेड – 11 हजार 434

नागपूर- 80 हजार 87

भंडारा- 11 हजार 311

गोंदिया- 10 हजार 677

चंद्रपूर – 21 हजार 292

एकंदरीत अॅक्टिव्ह रूग्णांचा विचार केला तर पुणे, ठाणे, नागपूर आणि मुंबई या चार जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रूग्ण आहेत. मुंबई आणि पुण्यात पॉझिटिव्ह केसेस कमी होत आहेत. ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. मात्र तरीही राज्याच्या पॉझिटिव्ह रूग्णसंख्येमध्ये मात्र घट होताना दिसत नाहीये. महाराष्ट्रात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. १ मेपर्यंत हे निर्बंध आहेत तोपर्यंत आता रूग्णसंख्या किती आटोक्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp