Fatah - 1 missile Attack On Indian City : पाकिस्तानने शुक्रवारी रात्री भारताच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर Fatah-1 मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेचा कारणास्तव हे ठिकाण सर्वजनिक करण्यात आलेलं नाहीय. हल्ल्यांमुळे या परिसरात आधीपासूनच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या मिसाईलला भारतीय एअर डिफेन्सने हवेतच पाडलं आहे. या मिसाईलचे मलबेही जमिनीवर पडले आहेत. फतेह-1 मिसाईल किती खतरनाक आहे? भारताचं किती नुकसान झालं असतं? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
Fatah-1 मिसाईल एक शॉर्ट रेंज बॅलेस्टिक मिसाईल आहे. पाकिस्तानने या मिसाईलची निर्मिती देशी स्तरावर केली आहे. याची हल्ल्याची क्षमता 150 किलोमीटरपर्यंत आहे. याचं अडवान्स व्हर्जन Fatah-2 आहे. हे मिसाईल 400 किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतं. या मिसाईलचं स्ट्रायकिंग पावर अचूक असतं.
यामुळे भारत्या महत्त्वाच्या ठिकाणांचं नुकसान होऊ शकतं. Fatah मिसाईल बनवण्यासाठी कमी किंमत मोजावी लागते. याचं परिचलन कॉस्ट कमी होण्यासोबतच अॅडवान्स नेव्हिगेशन सिस्टम, फ्लाईट कंट्रोल टेक्नोलॉजी आणि मिसाइल डिफेन्स सिस्टमला आव्हान देऊ शकते.
हे ही वाचा >> Ind vs Pakistan : पाकिस्तान पहाटे ३ वाजेपासून काय-काय करत होतं? भारतात कोणकोणत्या ठिकाणी केला हल्ला?
भारताच्या S-400 डिफेन्स सिस्टमला धोका
पाकिस्तानचं म्हणणं आहे की, त्यांनी Fatah मिसाईल यासाठी बनवली आहे, ज्यामुळे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला टार्गेट करता येईल. पाकिस्तानने Fatah-2 मिसाईलला रशिया निर्मित S-400 एअर सिस्टमला आव्हान देण्यासाठी बनवलं आहे.
Fatah - 2 मिसाईलची चाचणी
पाकिस्तानच्या सेनेनं मे महिन्यात या मिसाईलची यशस्वी चाचणी केली होती. यामुळे स्पष्ट झालं आहे हे पाकिस्तानचं खतरनाक आणि अॅडवान्स वेपन आहे. पाकिस्तानी सेनेकडून या चाचणीबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आली होती. हे मिसाईल भारतासाठी एक आव्हान आहे. या मिसाईच्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव आणखी वाढू शकतो.
हे ही वाचा >> भारताने 6 बॅलिस्टिक मिसाइल डागले, पाकिस्तानच्या 3 एअरबेसवर मोठे स्फोट, पाक लष्कराचा दावा
ADVERTISEMENT
