Ind vs Pakistan : पाकिस्तान पहाटे ३ वाजेपासून काय-काय करत होतं? भारतात कोणकोणत्या ठिकाणी केला हल्ला?
India vs Pakistan War Latest Update : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे.
ADVERTISEMENT

India vs Pakistan
▌
बातम्या हायलाइट

पाकिस्तानने पहाटे 3 वाजल्यापासून भारतावर केला हल्ला

भारतानेही एअर मिसाईल सिस्टम केली सुरु

पाकिस्तानने भारताच्या कोणत्या भागात केला हल्ला?
India vs Pakistan War Latest Update : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. काल शुक्रवारी रात्री उरी, जम्मू, पठाणकोट, पूंछमध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. परंतु, भारताने पाकिस्तानला जशाच तसं उत्तर देत त्यांचे ड्रोन हाणून पाडले. दरम्यान, आज शनिवारी पहाटे 3 वाजल्यापासून पाकिस्तानने भारताच्या 17 ठिकाणी हल्ले केले आहेत.
पाकिस्तानने आज पहाटे 3 वाजल्यापासून काय-काय केलं?
- पठाणकोट - ड्रोन दिसले
- राजौरी - मोठा गोळीबार, सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू, दोन सरकारी कर्मचारी गंभीर जखमी
- श्रीनगर - पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताने एअर मिसाईल सिस्टम सुरु केली.
- जैसलमेर (पोकरण) - प्रक्षेपणास्त्र सापडलं
- बडमेर - प्रक्षेपणास्त्र सापडलं आणि ड्रोन हल्ला
- जलंधर - प्रक्षेपणास्त्र सापडलं
- फिरोजपूर - फिरोजपूरच्या नागरि वस्तीत ड्रोन हल्ला, काही नागरिक जखमी
- अमृतसर - ड्रोन हल्ला
हे ही वाचा >> मोठी बातमी! पाकिस्तानची आता खैर नाही...भारताने एअर मिसाईल सिस्टम केलं सुरु, नेमका प्लॅन काय?
- तारानगर, चुरू राजस्थान - प्रक्षेपणास्त्र सापडलं
- सिरसा (फतेह मिसाईल डिफ्यूज) - प्रक्षेपणास्त्र सापडलं
- बारामुल्ला - गोळीबार
- कुपवाडा - गोळीबार
- नौशेरा - गोळीबार
- कछ, गुजरात - प्रक्षेपणास्त्र सापडलं
- बिकानेर - प्रक्षेपणास्त्र सापडलं
- पूंछ - प्रक्षेपणास्त्र सापडलं