Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने सुरु केलं 'बुनयान उल मरसूस', नेमका अर्थ काय?
Operation Sindoor Vs buryan ul marsoos : भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पाकिस्तानने सुरु केलं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस',

ऑपरेशन सिंदूरला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानचा नवा प्लॅन

'बुनयान उल मरसूस' चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या
Operation Sindoor Vs buryan ul marsoos : भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. आता भारताच्या ऑपरेशन सिंदूरला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने ऑपरेशन बुनयान अल मरसूस सुरु केलं आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून भारताच्या सीमा भागात काल रात्रीपासून सतत हल्ला केला जात आहे. परंतु, पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय सेनेकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे.
भारताच्या विरोधात पाकिस्तानने त्यांच्या या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन 'बुनयान अल मरसूद' ठेवलं आहे. याचा अर्थ असा आहे की, आरशासारखी मजबूत भिंत म्हणजेच एक देशी भिंत जी खूप मजबुतीने रक्षण करत आहे. या नावासोबत पाकिस्तानला ते जगात मजबूत असल्याचं दाखवायचं आहे.
हे ही वाचा >> मोठी बातमी! पाकिस्तानची आता खैर नाही...भारताने एअर मिसाईल सिस्टम केलं सुरु, नेमका प्लॅन काय?
या ऑपरेशनला नाव देत पाकिस्तानने शनिवारी भारतावर फतेह-1 मिसाईलसह ड्रोन डागले. रेडियो पाकिस्तानच्या माहितीनुसार, पाकिस्तानने ऑपरेशन बुनयान अल मरसूस सुरु केलं आहे. हे नाव कुरानातील एका आयतमधून घेतलं गेलं आहे. ज्याचा अर्थ होतो की मजबूत भिंत. या ऑपरेशनच्या माध्यमातून भारताच्या अनेक शहरांमध्ये हल्ले करण्यात आले आहेत. परंतु, भारतानेही पाकिस्तानच्या या ऑपरेशनला उखडून टाकलं आहे.
हे ही वाचा >> सर्वात मोठी बातमी... पाकिस्तानकडून भारतावर मोठा हल्ला, फतेह-1 बॅलिस्टिक मिसाइल सोडलं; भारताचंही चोख प्रत्युत्तर!
पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महानिर्देशक लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांचं म्हणणं आहे की, भारताने त्यांच्या सैन्य दलाच्या तीन अड्ड्यांवर हल्ला केला आहे. याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही भारताच्या पंजाब येथील सिख परिसरात सहा बॅलेस्टिक मिसाईल्स डागले. भारताने जे सुरु केलं आहे, आमचे सैनिक ते संपवण्याची तयारी करत आहेत.
पाकिस्तानने दावा केला आहे की, भारताच्या अन्य सैन्य दलांच्या ठिकाणांवरही हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानने काल रात्रीपासून नियंत्रण रेषेवर मोठा गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. पाकिस्तानने तीसपेक्षा जास्त ठिकाणांवर ड्रोन हल्ले केले. परंतु, भारताने पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निकामी केले.