मोठी बातमी! पाकिस्तानची आता खैर नाही...भारताने एअर मिसाईल सिस्टम केलं सुरु, नेमका प्लॅन काय?
India vs Pakistan War Situation : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर तणाव सुरुच आहे. जम्मू-श्रीनगरपासून पठाणकोट आणि पोखरण पर्यंत पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने दिलं चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने एअर मिसाईट सिस्टम अॅक्टिव्ह केली
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज दिल्लीत सेना प्रमुखांशी करणार चर्चा
India vs Pakistan War Situation : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर तणाव सुरुच आहे. जम्मू-श्रीनगरपासून पठाणकोट आणि पोखरण पर्यंत पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. परंतु, भारताने पाकिस्तानचे ड्रोन्स निकामी केले आहेत. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने भारताच्या 26 शहरांवर हल्ला केला. भारतानेही पाकिस्तानचे मनसुबे उधळून टाकत प्रतिहल्ला केला. याच पार्श्वभूमीवर भारताने 32 विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डॉनॉल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या वाढत्या तणावामुळे चिंता व्यक्त केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग CDS आणि तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांसोबत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
हे ही वाचा >> भारताने 6 बॅलिस्टिक मिसाइल डागले, पाकिस्तानच्या 3 एअरबेसवर मोठे स्फोट, पाक लष्कराचा दावा
जम्मू काश्मीरच्या सीमेवरून मोठी कारवाई
भारतीय सेनेकडून सर्जिकल स्ट्राईक सुरु करण्यात आलं आहे. संरक्षण खात्याच्या सूत्रांच्या माहितीनुसार, जम्मू सीमेवरून भारतीय सेनेनं पाकिस्तानचे पोस्ट्स आणि दहशतवादी लॉन्च पॅड्स उडवून टाकले आहेत. याठिकाणी ट्यूब ड्रोनही लॉन्च केलं जातं.
पाकिस्तानच्या गोळीबारीत भारताचं झालं मोठं नुकसान
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारीत जम्मू काश्मीरमध्ये राजौरीत एडिशनल डिस्ट्रिक्ट डेव्हलोपमेंट कमिशनर (ADCC) राजकुमार थप्पा यांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी थप्पा यांच्या मृत्यूबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. दु:ख व्यक्त करण्यासाठी शब्द नाही. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असं अब्दुला यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय.










