कुर्ल्यात भयंकर अग्नितांडव! 20 बाईक्सचा झाला कोळसा; आठव्या मजल्यापर्यंत आगीचे लोळ

मुंबई तक

• 03:11 AM • 13 Oct 2021

मुंबईतील कुर्ला भागात बुधवारी पहाटे झालेल्या अग्नितांडवात मोठी जीवित हानीची घटना थोडक्यात टळली. मात्र, या घटनेत पार्किंगमध्ये असलेल्या 20 ते 30 मोटारसायकलींचा जळून कोळसा झाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं. ही आग इतकी भीषण होती की पार्किंगमध्ये लागलेल्या आगीच्या झळा आठव्या मजल्यापर्यंत जाणवत होत्या. अग्निशमन दलांच्या बऱ्याच तासांच्या परिश्रमानंतर आग नियंत्रणात आली. मुंबईतील कुर्ला परिसरात असलेल्या […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतील कुर्ला भागात बुधवारी पहाटे झालेल्या अग्नितांडवात मोठी जीवित हानीची घटना थोडक्यात टळली. मात्र, या घटनेत पार्किंगमध्ये असलेल्या 20 ते 30 मोटारसायकलींचा जळून कोळसा झाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं. ही आग इतकी भीषण होती की पार्किंगमध्ये लागलेल्या आगीच्या झळा आठव्या मजल्यापर्यंत जाणवत होत्या. अग्निशमन दलांच्या बऱ्याच तासांच्या परिश्रमानंतर आग नियंत्रणात आली.

हे वाचलं का?

मुंबईतील कुर्ला परिसरात असलेल्या नेहरू नगर भागात बुधवारी पहाटे ही आगीची घटना घडली. इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या गाड्यांनी अचानक पेट घेतला. बघता बघता आगीने पार्किंगमध्ये इतर वाहनांनाही कवेत घेतलं.

सगळे जण गाढ झोपेत असताना आगीचं तांडव घालण्यास सुरूवात केली. आग लागल्याचं लक्षात आल्यानंतर रहिवाशांनी याची तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

तब्बल आठ बंबांबसह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत पार्किंग मोटारसायकली आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या होत्या आणि आगीने आक्राळविक्राळ रुप घेतलं होतं. आगीचं स्वरूप इतकं भीषण होत की, इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत झळा जाणवत होत्या.

अचानक धुराचे लोट उठू लागल्यानं परिसरातील नागरिकांचीही घटनास्थळी गर्दी होऊ लागली होती. दरम्यान, जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तसेच मोठी जीवित हानी टळली. दरम्यान, या आगीत पार्किंगमधील 20 ते 30 वाहनांचा जळून कोळसा झाला.

आगीच्या कारणाचं गुढ

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना कशी लागली, याबद्दलचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. आगीच्या कारणाबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. आग लागली की लावण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर इमारतीतील काही जणांनी सिगारेटमुळे आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला आहे. कुणीतरी सिगारेट पिल्यानंतर खाली टाकली असेल, ज्यामुळे आग लागली, अशी शंका उपस्थित केली आहे. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

    follow whatsapp