Bihar News: बिहारमध्ये एका महिलेने आपल्या पहिल्या प्रियकरासोबत मिळून प्रियकराची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. प्रियकर महिलेवर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव आणत असल्यामुळे महिलेने प्रियकराची हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी केला.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिली माहिती
बेगूसराय जिल्ह्यातील सिंघौल पोलीस स्टेशनच्या परिसरात ही घटन घडल्याचं समोर आलं आहे. प्रकरणातील मृत व्यक्तीचं नाव रूपेश कुमार असल्याची पोलिसांनी माहिती दिली. एसपी मनीष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी म्हणजेच अजय राम याच्या 27 वर्षीय पत्नी गुडिया देवीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
हे ही वाचा: शिक्षिकेचा विद्यार्थ्यावर जडला जीव, विद्यार्थ्याच्या प्रेमात मॅडम करून बसल्या भलतंच काही अन्..
पहिल्या प्रियकराने दिली धमकी
गुडिया देवीचं रूपेशवर प्रेम असून त्याच्यासोबत तिचे अनैतिक संबंध असल्याचं गुडियाने पोलिसांच्या चौकशीत सांगितलं. गुडियाचा पहिला प्रियकर अमरजीतला तिच्या आणि रूपेशच्या नात्याबद्दल समजलं. या प्रकरणाबद्दल कळताच अमरजीतने गुडियासोबतचं नातं संपवण्याची धमकी दिली. मात्र, गुडिला अमरजीतपासून वेगळं व्हायचं नव्हतं.
हे ही वाचा: तरुण आणि तरुणीच्या अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, नंतर बाळाला मारलं अन् हाडं बॅगेत भरून...
प्रियकराच्या मदतीने काटा काढला
त्यानंतर गुडिया देवी आपल्या दुसऱ्या प्रियकरापासून म्हणजेच रूपेशपासून दूर जाण्याचा प्रयत्न करु लागली. मात्र रूपेशला तिचं असं वागणं पटत नव्हतं. त्यामुळे तो गुडियावर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव आणू लागला. रूपेशच्या वागण्याला वैतागून गुडिया देवीने आपला पहिला प्रियकर अमरजीतसोबत मिळून रूपेशचा काटा काढायचा ठरवलं. अमरजीतसोबत मिळून तिने रूपेशच्या हत्येचा कट रचला आणि 27 जून रोजी रूपेशला गुडियाने आपल्या घराजवळ बोलवलं. त्यावेळी तिथेच बागेत गळा दाबून रूपेशची हत्या करण्यात आली. प्रकरणात वापरण्यात आलेली दोरी आणि एक मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.
ADVERTISEMENT
