जमशेदपूर: जमशेदपूरच्या मलियंता गावात एका लग्न समारंभात रसगुल्ला घशात अडकल्याने ललित सिंग नावाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लग्नातील मेजवानीत रसगुल्ला खात असताना त्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. उपस्थित लोकांनी रसगुल्ला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. त्यामुळे कुटुंबीयांनी ललितला तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांच्या मते, अन्न घशात अडकल्याने त्यांचा श्वासमार्ग बंद झाला होता.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
जमशेदपूरच्या बेलजुरी पंचायतीतील मालियंता गावात शुक्रवारी रात्री उशिरा एका लग्नसमारंभात एक दुःखद घटना घडली. मेजवानीत रसगुल्ला घशात अडकल्याने ललित सिंग यांचा मृत्यू झाला. त्यामुळे लग्नाचा आनंद हा शोकात बदलला आणि संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.
हे ही वाचा>> पत्नी गर्लफ्रेंडसोबत 'ती' गोष्ट नव्हती देत करू, पतीने सगळ्यांनाच टाकलं हादरवून...
मिळालेल्या माहितीनुसार, ललित सिंग शुक्रवारी रात्री सुमारे 1 वाजता गावातील एका लग्न समारंभात गेला होता. जेवणादरम्यान रसगुल्ला खाताच तो अचानक त्याच्या घशात अडकला. त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली.
रसगुल्ला काढण्याचे प्रयत्न ठरले अयशस्वी
घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी तात्काळ त्यांच्या घशातून रसगुल्ला काढण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. त्यांची प्रकृती अधिकच खालावत असल्याचे पाहून कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्याला तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
हे ही वाचा>> पुणे : 'माझी शेजारीण गोरीपान..', रशियन महिलेच्या रुममध्ये घुसला इंजिनिअर तरुण; पुढे काय घडलं?
डॉक्टरांच्या मते, घशात अडकलेल्या खाद्यपदार्थामुळे त्यांचा श्वासमार्ग बंद झाला होता, ज्यामुळे त्यांच्या शरीराला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला. अखेर शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे कुटुंब आणि गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ADVERTISEMENT











