Parali Tahsildar Suspension, योगेश काशीद : बीडच्या परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे. विभागीय आयुक्त यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यानंतर त्यांना अटक झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर न्यायालयाने मुंडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना बीड जिल्हा कारागृहात हलविण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे : 'माझी शेजारीण गोरीपान..', रशियन महिलेच्या रुममध्ये घुसला इंजिनिअर तरुण; पुढे काय घडलं?
महसूल प्रशासनात खळबळ
नियमांनुसार एखादा लोकसेवक 48 तासांपेक्षा अधिक काळ न्यायालयीन अभिरक्षेत राहिल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी अटकेच्या दिवसापासून म्हणजेच 20 फेब्रुवारीपासून व्यंकटेश मुंडे यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे परळीतील महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाची जिल्हाभरात चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा : भाजप नगरसेविकेची गुंडगिरी! बोरिवलीत एका खासगी दुकानात घुसून तोडफोड, मंदिराची विटंबना केल्याचा आरोप
काय होते प्रकरण?
बीड जिल्ह्यातील परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना फेब्रुवारी 2026 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाच प्रकरणात ताब्यात घेतले होते. एका प्रमाणपत्रासाठी 50 हजारांची मागणी करून तडजोडीअंती 20 हजार रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
ADVERTISEMENT











