Bhivandi crime : ठाणे जिल्ह्यात लज्जास्पद घटना घडल्याचे वृत्त आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत एका 15 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण केले. नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीला विकण्यात आले. या प्रकरणात अल्पवयीन मुलगी आणि इतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भाजप नगरसेविकेची गुंडगिरी! बोरिवलीत एका खासगी दुकानात घुसून तोडफोड, मंदिराची विटंबना केल्याचा आरोप
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बीडमधील वृद्ध व्यक्तीला विकले
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "पीडितेचे आपल्या गरीबीमुळे तसेच आई-वडिलांच्या अनुपस्थितीमुळे शोषण करण्यात आले होते. 26 फेब्रुवारी रोजी एक दलाल आणि त्याच्या साथिदारांनी अपहरण केलं आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवून तिला बीडमधील पाटोदा येथे एका वृद्ध व्यक्तीला विकण्यात आले होते.''
अल्पवयीन मुलीला धमकावून 27 फेब्रुवारी रोजी अवैध लग्नासाठी भाग पाडले
अल्पवयीन मुलीला धमकावून 27 फेब्रुवारी रोजी अवैध लग्नासाठी भाग पाडण्यात आले होते. पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या एफआरआयनुसार, 27 फेब्रुवारी ते 10 मार्चदरम्या तिचा नवरा, भाऊसाहेब तांबे याने तिला शेतातील एका शेडमध्ये डांबून ठेवले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पोलिसांनी सांगितलं की, मुलीकडे मोबाइल फोन नसल्याने तिच्याशी संपर्क देखील करता येत नव्हता, जेव्हा तिनं घटनास्थळावरून पळ काढला आणि श्रमिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना आपल्यावरील आत्याचाराबाबत सांगितले, तेव्हा ही घटना उघडकीस आली. या कार्यकर्त्यांनी तिच्यावर गुन्हा देखील दाखल करण्याची मदत केली.
हे ही वाचा : पतीने मित्रांना पार्टीसाठी घरी बोलावले, फुल्ल दारु प्यायले, अन् नंतर पत्नीवर चौघांचा सामुहिक बलात्कार
संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब तांबे, तसेच मध्यस्थी असलेला विलास हिलम आणि इतरांविरुद्ध पोक्सो कायदा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT











