धुळे: साक्री तालुक्यात पावसाचा कहर, वीज कोसळून 40 मुक्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना मेंढरांच्या कळपावर वीज कोसळली, या दुर्घटनेत तब्बल 40 मुक्या जनांवरांचा जीव गेल्याची मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे. निसर्गाच्या प्रकोपाने होत्याचं नव्हतं होऊन बसलं.

Dhule News

Dhule News

मुंबई तक

23 Jun 2026 (अपडेटेड: 23 Jun 2026, 08:00 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळली

point

40 मुक्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू

Dhule News : विशाल ठाकूर - धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना मेंढरांच्या कळपावर वीज कोसळली, या दुर्घटनेत तब्बल 40 मुक्या जनावरांचा जीव गेल्याची मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे. निसर्गाच्या प्रकोपाने होत्याचं नव्हतं होऊन बसलं. या घटनेनं मेंढपाळ आणि परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. ही दुर्घटना साक्री तालुक्यातील खुडाणे गावात घडली आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : भाच्याने आत्याचे पाय कापले, दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला अन्..

मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळली

जून महिना संपत आला तरीही राज्यात मान्सून दाखल झाला नव्हाता, मात्र आता मान्सून दाखल झाल्यानंतर निसर्गाचा कोप अनुभवण्यास मिळाला आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना डोंगराळ भागात मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या कळपावर वीज कोसळली. मेंढपाळ व्यक्तीची ज्ञानेश्वर तिरताप अशी ओळख पटली आहे.  

40 मुक्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू

दुपारनंतर अचानकपणे वातावरणात मोठा बदल झाला, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक वीज आली आणि मेंढरांच्या कळपावर कोसळली होती आणि क्षणातच होत्याचं नव्हतं होऊन बसलं. तब्बल 40 मुक्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मेंढपाळ ज्ञानेश्वर तिरताप यांनाही विजेचा झटका बसल्याने ते दुर्दैवी जखमी झाले, नंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

हे ही वाचा : भाच्याने आत्याचे पाय कापले, दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला अन्..

उपचारादरम्यान, मेंढपाळ ज्ञानेश्वर यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. वीज कोसळल्याने एकाच क्षणात तब्बल 40 मेंढ्याचा जीव गेल्याने मेंढपाळाची कमाई एका झटक्यात मातीमोल झाली. या घटनेनं तिरताप कुटुंबावर शोककळा पसरली. निसर्गाच्या या प्रकोपाने कुटुंबाचं कंबरडं मोडून गेलं. या घटनेनं परिसरात एकच हळहळ केली जात आहे.