Govt Jobs : ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी, संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनीत भरती, 'असा' करा अर्ज

संरक्षण मंत्रालयाच्या बीईएमएल लिमिटेड या कंपनीत आयटीआय उत्तीर्णांना सुवर्णसंधी चालून आली आहे. यासाठी काय निकष आहेत, जाणून घ्या.

Government Jobs

Government Jobs

मुंबई तक

• 03:35 PM • 21 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी

point

संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनीत भरती

point

'असा' करा अर्ज

Government Jobs : संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या 'बीईएमएल लिमिटेड' (Bharat Earth Movers Limited) या भारत सरकारच्या नामांकित कंपनीत 'ऑपरेटर' पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर भरती जाहीर झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 362 जागा भरल्या जाणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आयटीआय (ITI) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही सरकारी कंपनीत काम करण्याची एक उत्तम संधी आहे.

हे वाचलं का?

'असा' करा अर्ज

या भरतीमध्ये प्रामुख्याने आयटीआय फिटर, टर्नर, वेल्डर, मशिनिस्ट आणि इलेक्ट्रिशियन या ट्रेड्समधील उमेदवारांची निवड केली जाईल. ही नियुक्ती जास्तीत जास्त 4 वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर असेल. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मोजण्यासाठी 10 जुलै 2026 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना बीईएमएलच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.bemlindia.in) केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे.

हे ही वाचा : नवरा कामावर गेला, घरात बायको आणि प्रियकर एकत्रच अन्..

'इतका' पगार मिळणार

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 16,900 रुपये मूळ वेतन (Basic Pay) दिले जाईल. याशिवाय लागू असलेल्या दरांनुसार महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) (कंपनीचे निवासस्थान न मिळाल्यास) आणि दरमहा 1500 रुपये वैद्यकीय खर्च भत्ता यांसह इतर भत्तेही नियमांनुसार दिले जातील. आर्थिक आणि भत्त्यांच्या दृष्टीने ही नोकरी उमेदवारांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात, दौरा ठरला; निशाण्यावर कोण?

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख काय?

या भरतीसाठी खुला प्रवर्ग (GEN), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी 200 रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले असून ते परत केले जाणार नाही. तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PwD) उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2026 असून, पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करावेत.