वाह रे NEET परीक्षा घेणारे! नागपूरच्या विद्यार्थ्याला 'या' देशात दिलं परीक्षा केंद्र, काय होणार?

नागपूरच्या एका विद्यार्थ्याला नीट (NEET) पुनर्परीक्षेसाठी थेट अबुधाबी (युएई) येथील परीक्षा केंद्र देण्यात  आले आहे. या परीक्षेला अवघा एक दिवस शिल्लक असल्याने विद्यार्थी आणि त्याचे पालक प्रचंड चिंतेत आहेत.

Nagpur NEET Admit Card News

Nagpur NEET Admit Card News

योगेश पांडे

20 Jun 2026 (अपडेटेड: 20 Jun 2026, 10:48 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर : वाह रे परीक्षा घेणारे!

point

NEET च्या विद्यार्थ्याला 'या' देशात दिलं परीक्षा केंद्र

point

काय होणार?

Nagpur NEET Admit Card News : NEET परिक्षेतील घोळ काही थांबण्याचे नाव घेत नाही. पेपरफुटीनंतर नीटची पुनर्परीक्षा उद्या (21 जून) होणार आहे. मात्र त्याआधीच नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय परीक्षा एजंसीच्या (NTA)  निष्काळजीपणामुळे नागपूरच्या एका विद्यार्थ्याला नीट (NEET) पुनर्परीक्षेसाठी थेट अबुधाबी (युएई) येथील परीक्षा केंद्र देण्यात  आले आहे. या परीक्षेला अवघा एक दिवस शिल्लक असल्याने विद्यार्थी आणि त्याचे पालक प्रचंड चिंतेत आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या मूळ परीक्षेत या विद्यार्थ्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र मिळाले होते.

हे वाचलं का?

परदेशातील परीक्षा केंद्र

अब्दुल्लाह मोहम्मद तालिब असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. आपल्या अर्जामध्ये परीक्षा केंद्रासाठी नागपूर, वर्धा आणि भंडारा या शहरांचे पर्याय (प्रिफरेंस) निवडले होते. मात्र, NTA ने विद्यार्थ्याने दिलेले सर्व स्थानिक पर्याय पूर्णपणे नजरेआड करत त्याला थेट परदेशातील केंद्र देऊन टाकले. या गंभीर प्रकारावर महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते डॉ. अनीस अहमद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीवर घणाघाती टीका करत त्यांनी या विद्यार्थ्याला त्वरित सुधारित प्रवेशपत्र जारी करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा : पुणे : किल्ल्यावर पोज द्यायला गेला अन् भयंकर घडलं, तरुण बिझनेसमन जीवानिशी गेला

पासपोर्ट नाही, कसं जाणार?

संबंधित विद्यार्थ्याकडे परदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्टदेखील उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत अत्यंत कमी कालावधीत पासपोर्ट आणि व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करून त्याला परीक्षेसाठी परदेशात पाठवणे कुटुंबासाठी पूर्णपणे अशक्य आहे. या अजब गोंधळामुळे विद्यार्थ्याला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परीक्षा केंद्रातील या मोठ्या गडबडीनंतर पालकांनी तातडीने NTA च्या हेल्पलाइनवर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवली आहे.

हे ही वाचा : पुणे हादरलं, ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून; नेमकं काय घडलं?

अधिकाऱ्यांचे आश्वासन

NTA च्या अधिकाऱ्यांनी ही एक तांत्रिक चूक असल्याचे मान्य केले असून, सुधारित हॉल तिकीट जारी केले जाईल असे आश्वासन दिले आहे. डॉ. अनीस अहमद यांनी 'आज तक'शी फोनवरून बोलताना सांगितले की, त्यांनी हा विषय लावून धरल्यानंतर काल उशिरा रात्री NTA हेल्पलाइनशी संपर्क झाला. प्रशासनाने आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत विद्यार्थ्याला नागपूरचेच केंद्र देऊन नवीन हॉल तिकीट जारी केले जाईल, असे सांगितले आहे. मात्र, जोपर्यंत नवीन हॉल तिकीट हातात पडत नाही, तोपर्यंत विद्यार्थी आणि त्याचे कुटुंब तीव्र मानसिक तणावाखाली राहणार आहे.