पुणे हादरलं, ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून; नेमकं काय घडलं?
Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आर्वी गावात पती-पत्नीच्या वादातून 25 वर्षीय विवाहितेची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे हादरलं, ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून
नेमकं काय घडलं?
Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आर्वी गावात एका 25 वर्षीय विवाहितेची ओढणीने गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रुतुजा अक्षय तावरे असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी तिचा पती अक्षय रामदास तावरे याच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नानंतरच्या अवघ्या काही महिन्यांतच पती-पत्नीमध्ये घरगुती वादाला सुरुवात झाली होती, ज्याचे रूपांतर अखेर या भीषण हत्याकांडात झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा : 'मला बायकोपासून वाचवा', त्रासलेल्या पतीने व्याकूळ होऊन काय सांगितलं?
लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच वाद विकोपाला
रुतुजा आणि अक्षय यांचा विवाह 16 मे 2023 रोजी झाला होता, परंतु लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच त्यांच्यातील वाद विकोपाला गेले. अक्षयकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून रुतुजा सुमारे सहा महिन्यांपूर्वी आपल्या माहेरी पणदरे येथे निघून गेली होती. या वादावर तोडगा काढण्यासाठी बारामती महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती, जिथे दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत तडजोड होऊन ती पुन्हा पतीसोबत राहण्यास गेली होती. मात्र, काही काळाने पुन्हा भांडणे सुरू झाल्याने एप्रिल 2026 मध्ये ती पुन्हा माहेरी आली होती. 4 मे 2026 रोजी भावाने तिला सासवड येथे सोडले असता, आरोपी अक्षयने तिला आर्वीला नेले आणि तिथेच हा दुर्दैवी प्रकार घडला.
हेही वाचा : ‘किमान आदित्य ठाकरेंनी तरी...’, फुटलेले ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?









