नागपूर : ज्यूसमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार, ब्लॅकमेलिंग अन् जबरदस्तीने धर्मांतर

Nagpur Crime News : नागपूरमध्ये भारतीय वायुसेना जवानाच्या पत्नीचे धर्मांतरण आणि अत्याचार करणाऱ्या प्रकरणातील तिसरा मुख्य आरोपी मौलाना मजरत मेहमूद मकसूद याने अखेर पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.

Nagpur Crime News

Nagpur Crime News

मुंबई तक

• 07:11 AM • 20 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर : ज्यूसमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार

point

ब्लॅकमेलिंग अन् जबरदस्तीने धर्मांतर

Nagpur Crime News : नागपूरमध्ये भारतीय वायुसेनेतील जवानाच्या पत्नीचे धर्मांतरण आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या गंभीर प्रकरणातील तिसरा मुख्य आरोपी मौलाना मजरत मेहमूद मकसूद हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता, मात्र अखेर त्याने बुधवारी रात्री उशिरा सोनेगाव पोलीस ठाण्यात हजर होऊन शरणागती पत्करली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'मला बायकोपासून वाचवा', त्रासलेल्या पतीने व्याकूळ होऊन काय सांगितलं?

38 वर्षीय मौलाना मजरत हा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील रहिवासी असून, त्याला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून, त्याच्या अटकेमुळे या कथित धर्मांतरण प्रकरणाचे आणि अत्याचाराचे सत्य लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ज्यूसमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार 

या प्रकरणाची सुरुवात फेब्रुवारी 2025 मध्ये झाली, जेव्हा पीडित महिलेच्या य्याज ताज मदर या जुन्या सहकाऱ्याने प्लॉट खरेदीच्या बहाण्याने तिला भेटण्यासाठी बोलावले. महिलेच्या तक्रारीनुसार, वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये तिला ज्यूसमध्ये गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले. यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढले. या आक्षेपार्ह फोटोंचा आणि व्हिडिओंचा वापर करून आरोपीने तिची ब्लॅकमेलिंग सुरू केली. पीडितेकडून सुमारे 3 लाख 9 हजार रुपये उकळण्यात आले आणि तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सतत दबाव टाकला गेला, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : ‘किमान आदित्य ठाकरेंनी तरी...’, फुटलेले ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

 महिलेचा कलमा वाचतानाचा व्हिडीओ व्हायरल 

या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी यापूर्वीच 26 वर्षीय अय्याज ताज मदर आणि 30 वर्षीय अमीन शेख या दोन आरोपींना अटक केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पीडित महिला कलमा वाचताना आणि आरोपी तिच्यावर फुंक मारताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला होता. या व्हिडिओचे चित्रीकरण करणाऱ्या महिलेलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र ती उपस्थित न राहिल्याने पोलीस आता तिच्या घरी जाऊन जबाब नोंदवण्याची तयारी करत आहेत. या धर्मांतरण प्रकरणातील धार्मिक रितीरिवाज आणि प्रक्रिया कशा प्रकारे राबवल्या गेल्या, याचा उलगडा आता मौलानाची चौकशी केल्यानंतर होणार आहे.

पीडित महिला स्वतः एक प्रॉपर्टी डीलर असून तिचे पती भारतीय वायुसेनेत कार्यरत आहेत. आपल्या पतीच्या अनुपस्थितीत तिला या संकटाचा सामना करावा लागला, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणातील आरोपींची साखळी मोठी असून पोलीस आता सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मौलानाची अटक हे या प्रकरणातील एक मोठे यश मानले जात आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हेगारांना न्यायाच्या कचाट्यात खेचण्यासाठी सज्ज झाले आहेत.