Government Jobs : रेल्वेमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने 6,565 तंत्रज्ञ (Technician) पदांची मेगा भरती जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. रेल्वेतील आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी सुवर्णसंधी मानली जात आहे.
ADVERTISEMENT
पात्रतेचे निकष काय?
या भरती प्रक्रिये अंतर्गत प्रामुख्याने दोन प्रकारच्या पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये 'तंत्रज्ञ ग्रेड-1 सिग्नल' (Technician Grade I Signal) या पदासाठी 323 जागा उपलब्ध आहेत, तर 'तंत्रज्ञ ग्रेड-3' (Technician Grade III) या पदासाठी 6,242 अशा सर्वाधिक जागांवर उमेदवारांची निवड केली जाईल. B.Sc आणि ITI उत्तीर्णांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आली असून, ग्रेड-1 सिग्नल पदासाठी वय 18 ते 36 वर्षे आणि ग्रेड-3 पदासाठी वय 18 ते 33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांची वैद्यकीय पात्रता रेल्वेच्या निश्चित 'बी-1' आणि इतर अधिसूचित मानकांनुसार असणे अनिवार्य आहे.
हे ही वाचा : ओमराजे फुटले, पण आता कैलास पाटलांचा मोठा निर्णय, काय म्हणाले?
पगार किती मिळणार?
निवड होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार (7th CPC) आकर्षक पगार आणि भत्ते दिले जातील. 'तंत्रज्ञ ग्रेड-1 सिग्नल' हे पद पे-लेव्हल 5 अंतर्गत येते, ज्याचे मूळ वेतन रुपये 29,200/- असेल. तर 'तंत्रज्ञ ग्रेड-3' हे पद पे-लेव्हल 2 अंतर्गत असून त्याचे मूळ वेतन रुपये 19,900/- असणार आहे. या मूळ वेतनासोबतच रेल्वेच्या नियमांनुसार महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वाहतूक भत्ता (TA) आणि इतर सर्व शासकीय सोयी-सुविधा व लाभ कर्मचाऱ्यांना लागू राहतील.
हे ही वाचा : ओमराजे निंबाळकर कसे फुटले? कोणी केला मोठा गौप्यस्फोट?
'ही' आहे अंतिम मुदत
या मेगा भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जून पासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. उमेदवारांना त्यांचे अर्ज सादर करण्यासाठी 29 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, परीक्षेचे स्वरूप आणि सविस्तर अटी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी रेल्वे भरती बोर्डाच्या www.rrbcdg.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणि वेळेत आपले अर्ज सादर करावेत.
ADVERTISEMENT











