Maharashtra Weather : राज्यात पावसाचा विलंब, 'या' जिल्ह्यांत उष्णतेचा व्हेव्ह; काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 16 Jun 2026

Maharashtra Weather : 16 जूनसाठी विविध भागांत उष्ण आणि पावसाचा सतर्कतेचा इशारा वर्तवण्यात आला आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट वर्तवण्यात आला आहे. अशातच जाणून घेऊयात 16 जून 2026 रोजी राज्यातील हवामानाचा अंदाज. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल

point

16 जूनसाठी विविध भागांत उष्ण आणि पावसाचा सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather : राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसतो. 16 जूनसाठी विविध भागांत उष्ण आणि पावसाचा सतर्कतेचा इशारा वर्तवण्यात आला आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट वर्तवण्यात आला आहे. अशातच जाणून घेऊयात 16 जून 2026 रोजी राज्यातील हवामानाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे : आकुर्डीत डॉक्टरकडून महिला रुग्णाचा विनयभंग, महिला ओरडू लागली..

कोकण 

कोकण विभागात पालघर, ठाणे आणि मुंबई या तीन जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे रायगड आणि रत्नागिरीत मेघगर्जनेसह पावसाची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान आणि काही ठिकाणी पावसाच्या सरींचा अनुभव येणार आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. दुपारी तापमानात वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्टचा अंदाज व्यक्त करण्यात आला. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अलर्ट नसला तरीही काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, जालना आणि धाराशिव या पाच जिल्ह्यांना उष्णतेच्या लाट जाणवण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. 

हे ही वाचा : दीराचे वहिनीशी प्रेमसंबंध, नणंदेनं नको त्या अवस्थेत पाहिलं अन्..

विदर्भ 

विदर्भातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या 3 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. काही ठिकाणी उष्ण आणि कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे.