कल्याण: हुंडा न दिल्यानं सुनेचं मुंडन केलं, उकळतं पाणी टाकून..

Kalyan crime : कल्याणच्या वालधुनी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला आहे. हुंड्याती मागणी पूर्ण न केल्याने सासरच्या मंडळींनी एका विवाहितेचे जबरदस्ती मुंडन केल्याची घटना घडली आहे. पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला.

Kalyan crime

Kalyan crime

मिथिलेश गुप्ता

16 Jun 2026 (अपडेटेड: 16 Jun 2026, 12:47 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पीडितेला सासरच्या मंडळींकडून पैशांची मागणी

point

पीडितेवर उकळतं गरम पाणी टाकलं आणि केस कापले

Kalyan Crime : कल्याणच्या वालधुनी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने सासरच्या मंडळींनी एका विवाहितेचे जबरदस्ती मुंडन केल्याची घटना घडली आहे. पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला. पीडित महिलेवर सध्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनं परिसर हदरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश, 'हे' लोक 'या' क्षेत्रात कमावणार नाव

पीडितेला सासरच्या मंडळींकडून पैशांची मागणी

घडलेल्या घटनेनुसार, उल्हासनगर येथील पीडित महिलेचा नोव्हेंबर 2025 रोजी विवाह झाला होता. कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या समीर अन्सारी हिच्याशी झाला होता. पीडितेच्या कुटुंबीयांचं म्हणणे असं की, विवाहापूर्वीच त्यांनी आपली आर्थिक परिस्थितीत सासरच्या मंडळींना सांगितली होती, यानंतर हुंडा देण्यास तिचे माहेरची मंडळी असमर्थ असल्याचे सांगितलं. लग्नानंतर काही महिन्यात पीडितेकडे तिच्या सासरच्या मंडळींनी हुंड्याची मागणी केली होती. 

पीडितेवर उकळतं गरम पाणी टाकलं आणि केस कापले

तिच्या हातावर उकळतं गरम पाणी टाकलं, दैनंदिन उपयोगासाठी तिला पैसे देखील दिले नाहीत. तिचे केस कापून तिचे विद्रुपीकरण केले. सासू, सासरे आणि नणंद यांनी तिच्यावर सातत्याने हल्ला केला. पीडितेनं केलेल्या आरोपानुसार, 7 जून रोजी तिच्या डोक्यात उवा झाल्याचे खोटे कारण देत तिच्या सासरच्या मंडळींनी परिसीमा गाठत तिचं मुंडन केले. 

या घटनेनं पीडिता मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेली होती. मात्र, नंतर पीडित महिला आपल्या बहिणीच्या घरी पोहोचली. तिथून तिने भावाला फोन केला आणि घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांनी तातडीने कारवाई करून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेच्या भावाने मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण लक्षात घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. 

हे ही वाचा : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण : पद्मसिंह यांच्या वकिलाचा 1250 पानांचा लेखी युक्तिवाद, काय म्हटलं होतं?

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. पीडित कुटुंबाने आरोपींविरोधात हुंडाबळी प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार संबंधित कलमांअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली.