पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण : पद्मसिंह यांच्या वकिलाचा 1250 पानांचा लेखी युक्तिवाद, काय म्हटलं होतं?

मुंबई तक

Pawanraje Nimbalkar murder case : न्यायालयात पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांकडून कोणते युक्तीवाद करण्यात आले आहेत? याची माहिती आपण जाणून घेऊयात... 

ADVERTISEMENT

Pawanraje Nimbalkar murder case
Pawanraje Nimbalkar murder case
google news

बातम्या हायलाइट

point

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण

point

पद्मसिंह यांच्या वकिलाचा 1250 पानांचा लेखी युक्तिवाद, एका क्लिकवर

Pawanraje Nimbalkar murder case, धाराशिव - गणेश जाधव : पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज (दि.16) लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.  मात्र, न्यायालयाने निकालाची तारीख पुढे ढकलली आहे.  निकाल तीन दिवसांनी 20 जूनला लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.  न्यायाधीशांनी निकालाचा मसुदा (जजमेंट) तयार करून त्याचे डिक्टेशन पूर्ण केले आहे. मात्र, त्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असून अंतिम संकलन (कम्पायलेशन) बाकी आहे. नियमित स्टेनोग्राफर रजेवर असल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. तसेच, संपूर्ण न्यायालयीन सुट्टीदरम्यान न्यायाधीश विविध कामकाज आणि नियुक्त्यांमध्ये व्यस्त होते, त्यामुळे निर्णय अंतिम स्वरूपात तयार करता आला नाही. सीबीआयच्या वकिलांनी आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे सांगितले. त्यांना नागपूरला जावे लागणार असल्याने त्यांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली. अखेरीस न्यायाधीशांनी ती विनंती मान्य केली आणि निकाल जाहीर करण्याची तारीख 20 जूनपर्यंत पुढे ढकलली.

हेही वाचा : Maharashtra Monsoon : उष्णतेची लाट कुठल्या भागांमध्ये धडकणार? पाऊस कधी येणार?

दरम्यान, न्यायालयात पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांकडून कोणते युक्तीवाद करण्यात आले होते? याची माहिती आपण जाणून घेऊयात... 

डॉ पाटील निर्दोष - 1 हजार 250 पानांचा लेखी युक्तिवाद

हे वाचलं का?