ओमराजे निंबाळकर कसे फुटले? कोणी केला मोठा गौप्यस्फोट?

मुंबई तक

Sushma andhare on omraje nimbalkar : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेबाबत निर्माण झालेल्या संभ्रमानंतर ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या राजकारणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.

ADVERTISEMENT

Sushma andhare on omraje nimbalkar
Sushma andhare on omraje nimbalkar
google news

बातम्या हायलाइट

point

ओमराजे निंबाळकर कसे फुटले?

point

कोणी केला मोठा गौप्यस्फोट?

Sushma andhare on omraje nimbalkar :  ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी वेगळा मार्ग निवडलाय. उद्धव ठाकरेंचे लोकसभेत एकूण 9 खासदार होते, त्यातील 6 खासदारांनी त्यांची साथ सोडली आहे. या सर्वांमध्ये सर्वात जास्त चर्चा होती ती धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची... लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये स्वत:ला निष्ठावंत बिरुदावली लावून यश मिळवलेले ओमराजे निंबाळकर आता शिंदेसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. मात्र, ठाकरेंचे निष्ठावंत अशी ओळख निर्माण केलेले ओमराजे निंबाळकर कसे फुटले? याची स्टोरी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितली आहे. त्या काय म्हणाल्या? सविस्तर जाणून घेऊयात... 

हेही वाचा : संजय राऊत भडकले, राजाभाऊ वाजेंच्या अश्रू तरळले, पत्रकार परिषदेत काय घडलं?

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

सुषमा अंधारे म्हणाल्या, काल पासून संभ्रम ओमराजे कुठे आहेत? हा संभ्रम सुरु होता. ओमराजे हलणार नाहीत, असं आम्हाला वाटत होतं. यातील प्रत्येकाने शपथा घेतल्या. कोणी आई-भवानीची शपथ घेतली. कोणी आपल्या लेकरांची आईची देखील शपथ घेतली. जे देवाची शपथ घेऊन देवालाही सोडत नाहीत. पोराबाळांची शपथ घेऊन त्यांची परवा करत नाहीत. ते पक्ष नेतृत्वाची परवा करणे हे चुकीचे आहे. परंतु, काल रात्री 10.30 एक चार्टर आलं. त्याला तानाजी सावंत लीड करत होते. त्यामध्ये नानासाहेब पाटील, जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर हे तानाजी सावंत यांच्यासमवेत दिल्लीला गेले. खरंतर यांचं दिल्लीला जाणे अचानक नव्हतं. 10 तारखेला दिल्लीला एनडीएची बैठक झाली. मोदींनी घेतलेल्या बैठकीनंतर हॉटेल ताज मानसिंगला एक बैठक झाली. आता गेलेले लोकं त्या बैठकीला उपस्थित होते. ओमराजेंच्या एका महत्त्वाच्या केसचा निकाल आहे. निकाल 20 तारखेला येणार आहे. निकालावर हे सगळं अवलंबून असाव? आम्ही तुमचा पारंपारिक विरोधक संपवून टाकू, असा काही शब्द देण्यात आला आहे.? 

हेही वाचा : चंद्रपूर : आधी आईचा जळून मृत्यू, नंतर चिमुरडा नाल्यात बुडाला; एकाच दिवशी काय घडलं?

हे वाचलं का?