'किसिंग आणि बेड सीन्स करावे लागतील..', 'मी पॉर्नच करते ना...' अभिनेत्रीने दिलं असं उत्तर अन्..

मुंबई तक

• 09:57 PM • 18 Jun 2026

अभिनेत्री कनिका माहेश्वरी सध्या ही तिच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. जाणून घ्या ती नेमकं काय म्हणाली होती.

Will have to do kissing and bed scenes actress kanica maheshwari furious at demand

Photo: Instagram @kanicamaheshwari

Google CTA

मुंबई: अभिनेत्री कनिका माहेश्वरी सध्या 'सहर होने को है' या टीव्ही शोमध्ये दिसत आहे. ती तिच्या नकारात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. पण सध्या तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे ती बरीच चर्चेत आहे. जाणून घ्या तिने नेमका कोणता अनुभव सांगितला होता.

हे वाचलं का?

इतर नायिकांप्रमाणेच कनिकालाही इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे. एका कास्टिंग एजंटने तिच्याशी गैरवर्तन केले. तिने हॉटरफ्लायशी बोलताना असाच एक प्रसंग सांगितला.

 

 

कनिकाच्या म्हणण्यानुसार, कास्टिंग एजंटने तिला सांगितले, "मॅडम, २-३ किसिंग सीन्स आणि एक बेड सीन आहे. आम्ही जास्त काही दाखवणार नाही. फक्त पाय, मांड्या आणि क्लीवेज. तुम्ही हे कराल का?"

 

 

कनिकाने सडेतोड उत्तर दिले, "मी पॉर्न करते. तुमच्याकडे तशी भूमिका असेल तर मला सांगा."

यानंतर कनिकाने त्या माणसाचा कॉल कट केला. मग त्याने पुन्हा कॉल केला आणि कनिकाने त्याला चांगलेच सुनावले.

 

अभिनेत्री म्हणाली, "तुम्ही सीनमध्ये सगळं काही दाखवत आहात. तुम्ही माझ्याकडून सगळं काही करून घेत आहात. मग तुम्ही पॉर्न फिल्म्स का करत नाही? तिथे मला जास्त पैसे मिळतील."

त्या माणसाने स्पष्ट केले, "आजकाल सगळेच असे सीन करतात." मग मी त्याला म्हणाले की, विचारायची सभ्यता तुमच्यात असायला हवी होती.

 

कनिकाने कास्टिंग काउचबद्दल तिला मिळालेले अप्रत्यक्ष संकेत उघड केले. कोणीतरी तिला विचारले, "तू कुठे राहतेस? तू कोणासोबत राहतेस? तू कधी झोपतेस?"

कनिकाने स्पष्ट केले की, असे प्रकार टाळण्यासाठी ती रात्री ८ नंतर कोणालाही भेटत नाही. ती रात्री १० नंतर व्यावसायिक फोन घेत नाही.