छत्रपती संभाजीनगरात खवड्या टेकडी प्रकरणाला वळण, 2025 मध्ये मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई तक

23 Aug 2026 (अपडेटेड: 23 Aug 2026, 06:38 PM)

Chhatrapati sambhajinagar suicide : छत्रपती संभाजीनगर येथील डोंगरावरून उडी मारत मुलाने जीवन संपवलं होतं. वडिलांशी झालेल्या वादावरून तरुणाने 2025 मध्ये त्याच डोंगरावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. 

Chhatrapati sambhajinagar suicide

Chhatrapati sambhajinagar suicide

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आयफोनच्या इएमआयवरून झालेल्या वादाने मुलाने उचललेलं टोकाचं पाऊल

point

अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलाला सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलं

Chhatrapati Sambhajinagar Suicide : छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावरून उडी मारत मुलाने जीवन संपवलं होतं. त्यानंतर आई वडिलांनी देखील अंदाजे 400 फूट खोल दरीत उडी मारत जीवन संपवलं. याच प्रकरणाला आता वेगळं वळण प्राप्त झालं आहे. वडिलांशी झालेल्या वादावरून तरुणाने 2025 मध्ये त्याच डोंगरावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नागपूर : एकीवर दोघांचा जडला जीव, आरोपीच्या जामिनानंतर रक्तरंजित थरार

आयफोनच्या इएमआयवरून झालेल्या वादाने मुलाची आत्महत्या? 

ही घटना शुक्रवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरच्या खावडा टेकडीवर घडली होती. या घटनेनं महाराष्ट्र हादरून गेला आहे. कुणाल चांदवडे, वडील मुरलीधर आणि आई संगीता यांचा काहीच क्षणांतच मृत्यू झाला. एका झटक्यात अख्ख्या कुटुंबाचा अंत झाला. या तपासातून नवीन अपडेट समोर आलेली आहे. आयफोनच्या इएमआयवरून झालेला वाद हे त्यामागील मुलाने उचललेलं टोकाचं पाऊल होते, की इतर कोणतं कारण होतं. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलाला सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलं

संबंधित मुलगा सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास टेकडीजवळ पोहोचला होता आणि आई-वडील, गावकरी, पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले होते,  मात्र संबंधित तरुण हा जवळपास तीन तास 400-500 फूट उंच कड्याच्या काठाजवळच थांबून राहिला होता. 

हे ही वाचा : बायकोच्या माहेरच्या मंडळींनी सॉफ्टवेअर इंजीनिअर जावयाला संपवलं अन्..

आई त्याच्याशी बोलत राहिली होती आणि मागे हटण्याची अनेकदा विनंती देखील केली होती, तर दुसरीकडे बचाव पथकाने कड्याखाली सुरक्षिततेसाठी जाळ्या लावल्या होत्या. याच परिस्थितीत मुलगा आत्महत्येसाठी सातत्याने जागा बदलायचा, नंतर हे बचावकार्य अवघड होऊन बसल्याची माहिती समोर आली.