बारामती : रोहित पवारांच्या पीएच्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

23 Aug 2026 (अपडेटेड: 23 Aug 2026, 12:52 PM)

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या पीएच्या मुलीचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली असून मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही.

Baramati News

Baramati News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

रोहित पवारांच्या पीएच्या लेकीचा संशयास्पद मृत्यूने खळबळ

point

नेमकं काय घडलं?

Baramati News : बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर भागात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

हे वाचलं का?

रोहित पवारांच्या पीएची मुलगी

मृत मुलगी ही आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक (पीए) अजित दशावतरे यांची मुलगी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि बारामतीत हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित कुटुंबियांवर या घटनेमुळे मोठा आघात झाला आहे.

हे ही वाचा : मुंबई : गणपती आगमनाला गालबोट, भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू; काय घडलं?

हत्या की आत्महत्या

मुलीचा मृत्यू नेमका कसा झाला, ही हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता झालेली नाही. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अधिकृत वैद्यकीय अहवाल आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा : मोदींच्या 'त्या' इंस्टाग्राम व्हिडीओवरुन राहुल गांधींची टीका, मुलींना पितृसत्ता मोडून काढण्याचे आवाहन

रोहित पवार रुग्णालयात

घटना घडल्याची माहिती मिळताच आमदार रोहित पवार बारामती मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी 4 वाजता आईशी वाद झाल्यामुळे ही मुलगी रुसून निघून गेली होती. पोलीस तिचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणी पथके पाठवत असतानाच आज सकाळी 8.30 च्या सुमारास मुलीचा मृतदेह आढळला.

याबाबत बारामतीचे डीवायएसपींनी सांगितले की, मुलगी जिथे राहत होती, त्याच्या शेजारच्या इमारतीच्या गच्चीवर तिची चप्पल सापडली असून गच्चीचा दरवाजा बंद होता. प्राथमिकदृष्ट्या हे आत्महत्येचे प्रकरण वाटत असले तरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.